मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना लस घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नाहीतर लसीकरणही पडेल महागात

कोरोना लस घेण्याआधी हा VIDEO जरूर पाहा; नाहीतर लसीकरणही पडेल महागात

1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जाणार आहे. त्याआधी हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जाणार आहे. त्याआधी हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

1 मेपासून 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) केलं जाणार आहे. त्याआधी हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

मुंबई, 26 एप्रिल : देशातील कोरोना (Coronavirus) रुग्णांचा आकडा पाहता प्रत्येक जण कोरोनापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. लस घेण्यासाठी (Corona vaccine) लसीकरण केंद्रांवर (Corona vaccination centre) धावत आहेत. त्यातच सरकारने आता 18 वर्षांवरील लोकांनाही 1 मे पासून लस देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे ही गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे. जिथं गर्दी तिथे कोरोनाचा धोका हा आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रावरही कोरोनाचा धोका टाळता येऊ शकत नाही. अशावेळी लसीकरण केंद्रावर गेल्यावर तुम्ही लस घ्यावी पण जमलेल्या गर्दीमुळे तुम्हाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, हे मुंबईतल्या एका डॉक्टराने सांगितलं आहे.

कोरोनाव्हायरसबाबत जनजागृती करणाऱ्या मुंबईतल्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुंबईतील डॉ. तुषार शहा यांचा हा व्हिडीओ. Zucker Doctor या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर तुषार आपल्या हातात काही फलक घेऊन उभे असल्याचं दिसतात.

पहिल्या फलकावर लिहिलं आहे, ‘लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आपल्याला लस देतात.’. दुसऱ्या फलकावर लिहिलं आहे, ‘लसीकरण केंद्रावरची गर्दी आपल्याला कोरोना विषाणू देते.’ तिसऱ्या फलकावर लिहिलं आहे, ‘तुम्ही फक्त लस घ्या आणि त्या विषाणूने बाधित होऊ नका.’ चौथ्या फलकावर लिहिलं आहे,‘तुम्ही हे कसं कराल?’

हे वाचा - आता घरातही MASK वापरा; कोरोनापासून बचावासाठी मोदी सरकारची नवी सूचना

यानंतर पुढील काही फलकांवर लसीकरण केंद्रावर कोरोनापासून आपला बचाव कसा करावा, याबाबत सल्ला देण्यात आला आहे. तोंडावर दोन मास्क लावा. आतमध्ये  N95आणि बाहेर सर्जिकल मास्क. 2 हातमोजे वापरा. तसंच तोंडाला हात लावणं हस्तांदोलन करणं टाळा. हातमोजे घातलेल्या हातांनाही सॅनिटायझर लावा आणि कुणाशीही अजिबात बोलू नका, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

लसीकरण केंद्रांवर लोकं हस्तांदोलन करतात, गप्पा मारत उभे असतात याबद्दलचं निरीक्षण करूनच डॉ. शहा यांनी या सूचना देणारा व्हिडिओ तयार केला आहे. त्याचबरोबर त्यांनी असा सल्ला दिला आहे की लसीकरणाला जाण्यापूर्वी शरीरात पाणी असू द्या त्यामुळे तिथं जाण्याआधी चहा किंवा कॉफी घेऊन जा. तसंच लसीकरणाच्या रांगेत उभं राहून अन्नपदार्थ खाणं, पाणी पिणं हे सगळं टाळा तुम्ही जर लसीकरण केल्याचा फोटो काढत असाल तर तुमच्या चेहऱ्यावरचा मास्क काढू नका.

हे वाचा - ...तर तुम्ही कोरोना लस घेऊ नका; लस उत्पादक कंपन्यांनीच दिला सल्ला

या व्हिडिओमध्ये संगीत नाही की शब्द उच्चारलेले नाहीत पण तो इतका मोलाचा संदेश देत आहे त्यामुळे तो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. डॉ. शहा यांनी केलेल्या या प्रयत्नाचं लोक खूप कौतुकही करत आहेत. तुम्ही आम्हीही ही पथ्य पाळूया आणि कोरोनाला रोखूया.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus