मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'Corona Vaccine न घेणं ही माझी सर्वात मोठी चूक'; कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णाने व्यक्त केली खंत 

'Corona Vaccine न घेणं ही माझी सर्वात मोठी चूक'; कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णाने व्यक्त केली खंत 

लोकांची लस घेण्याबाबतची उदासीनता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं चित्र आहे.

लोकांची लस घेण्याबाबतची उदासीनता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं चित्र आहे.

लोकांची लस घेण्याबाबतची उदासीनता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचं चित्र आहे.

इंग्लंड, 24 जुलै : गेल्या दीड वर्षांपासून सगळं जग कोरोना विषाणूच्या महाभयंकर साथीचा (Coronavirus Pandemic) सामना करत आहे. या विषाणूविरोधातल्या लढ्यात साह्य करणाऱ्या लशी आता उपलब्ध झाल्यानं जगभरात सर्वत्र लसीकरण (Vaccination) मोहीम राबवण्यात येत आहे. लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं जात आहे. लशीचे दोन डोस घेतल्यानं कोरोना विषाणूपासून असलेला धोका कमी होत आहे. संसर्ग झाला, तरी रुग्ण वाचण्याची शक्यता वाढत आहे.

तसंच सतत आपल्या रचनेत बदल करत असलेल्या या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत मिळत आहे; मात्र लोकांची लस घेण्याबाबतची उदासीनता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. सध्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटने (Delta Variant) युरोपात थैमान घातलं असून, ब्रिटन (Britain) आणि अन्य काही देशांमध्ये पुन्हा एकदा रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे; मात्र लस न घेतल्याने कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग झालेल्या अनेक नागरिकांना आता पश्चात्ताप होत असल्याचंही दिसून येत आहे. 'बीबीसी हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर अमेरिका, रशियासह अनेक युरोपीय देशांनी लस उत्पादक कंपन्यांकडून प्रचंड प्रमाणात लस खरेदी करून आपल्या देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे चीन, भारत आदी देशांच्या तुलनेत कमी लोकसंख्या असणाऱ्या या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आणि तिथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालण्यात आलेले मास्क (Mask), दोन हात अंतर (Social Distancing), तसंच सार्वजनिक जीवनातले निर्बंध थोडे शिथिल झाले. अनेक ठिकाणी लोक मास्कमुक्त होऊन कोरोनापूर्व काळाप्रमाणे नेहमीचं आयुष्य जगू लागले आहेत.

लसीकरणाचं प्रमाण 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्याने, संसर्गाचा धोका कमी झाल्याने सार्वजनिक जीवन पूर्ववत झालं आहे. अर्थात कोरोनाचा धोका संपलेला नाही; मात्र लसीकरण हाच या संकटातून मुक्त होण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग असल्याचं सिद्ध झालं असूनही अनेक लोक लस घेण्यासाठी तयार नाहीत. आपली प्रतिकारशक्ती उत्तम असल्यानं आपल्याला लसीची गरज नाही. आपण कोरोनाच्या विषाणूवर सहज मात करू, असा विश्वास असणाऱ्या अनेक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर पश्चात्ताप होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. याचंच एक प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे ब्रिटनमधले ब्रॅडफोर्ड (Bradford) इथले 54 वर्षीय फैसल बशीर.

हे ही वाचा-कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पोहोचला 124 देशांत, जगभरात चिंता वाढली

फैसल बशीर हे नियमित व्यायाम करणारे, प्रकृती अत्यंत तंदुरुस्त असलेले व्यक्ती आहेत. त्यामुळे आपल्याला लस घेण्याची काहीही गरज नाही असा विश्वास त्यांना होता. त्यातच सोशल मीडियावर येणारी उलटसुलट माहिती वाचून त्यांना लस घेतल्यानं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होईल, असं वाटत होतं; मात्र कुठून कसा कोण जाणे त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आणि त्यांची तब्येत बिघडली. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करून ऑक्सिजन (Oxygen) लावण्याची वेळ आली. जवळपास एक आठवडा त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. या अनुभवाने शहाणपण आलेल्या बशीर यांना आपण लस न घेतल्याचा पश्चात्ताप होत असून, आता ते इतरांना लस घेण्यासाठी उद्युक्त करत आहेत.

आपण कितीही तंदुरुस्त आहोत असं वाटत असलं तरी कोरोनाचा विषाणू आपल्यावर हल्ला करू शकतो. लस घेतली असती तर लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी झाली असती आणि त्यातूनही संसर्ग झाला असता तर गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता कमी झाली असती. अशा स्थितीत हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी घरी उपचार करणं शक्य झालं असतं. यामुळे वेळ, पैसा, आरोग्य आणि सर्वांना होणारा मनस्ताप यातून सुटका झाली असती, असं आता बशीर यांना वाटत आहे. लस न घेता लोक आपल्या आरोग्यासाठी जोखीम निर्माण करत असल्यानं हॉस्पिटल्स पुन्हा एकदा भरत आहेत, ही अत्यंत दुखद बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणूनच ते आता इतरांना लस घेण्याकरिता प्रोत्साहन देत आहेत.

ब्रिटनमधील ब्रॅडफोर्डमध्ये तीन चतुर्थांश प्रौढ नागरिकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. इथे मोठ्या प्रमाणात लोक लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं पुन्हा कोविड-19च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फर्मरी हॉस्पिटलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोविड -19चे रुग्ण दाखल होत असून, त्यात बहुतांश रुग्ण हे लस न घेतलेले आहेत. आता त्यांना आपण लस न घेतल्याचा पश्चात्ताप होत असल्याचं निरीक्षण इथले डॉक्टर आबिद अजीज (Dr.Abdul Ajij) यांनी नोंदवलं आहे.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यानंतर गेल्या महिन्यात पहिल्यांदा हॉस्पिटल्समधल्या रुग्णांचं प्रमाण दहापेक्षा कमी झालं होतं. आता या आठवड्यात ते 50वर गेलं आहे. डेल्टा व्हॅरिएंटमुळे हे प्रमाण वाढत असून, यात तरुणांची, तसंच टीनएजर मुलांची संख्या अधिक आहे. अर्थात यापैकी फार कमी जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडत आहे. ज्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना झालेल्या आजाराचं प्रमाण सौम्य आहे. त्यांनी लस घेतली नसती तर त्यांचा जीव वाचवणं अवघड गेलं असतं, असं डॉ. अजीज यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus