महिलांनो Alert राहा! तुमच्यासाठी भयंकर ठरतेय कोरोनाची दुसरी लाट कारण...

महिलांनो Alert राहा! तुमच्यासाठी भयंकर ठरतेय कोरोनाची दुसरी लाट कारण...

Coronavirus in women : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महिलांना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

  • Share this:

हैदराबाद, 10 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Covid Second Wave) देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच रुग्णांच्या संख्येतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दुसऱ्या लाटेतील आकडेवारीनुसार पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत महिलांना कोरोनाची लागण जास्त होत आहे (More women infected with corona).

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका हा पुरुषांना बसला होता. पहिल्या लाटेत कोरोना संसर्गाचं प्रमाण पुरुषांमध्ये जास्त होतं पण दुसऱ्या लाटेत महिलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. हैदराबादच्या आरोग्य विभागाच्या (Hyderabad health department) आकडेवारीनुसार दुसऱ्या लाटेतील एकूण रुग्णसंख्येत महिलांचं प्रमाण 38.5 टक्के आहे. हेच प्रमाण गेल्यावर्षी जुलै महिन्यात 34 टक्के होतं.

देशभरातील आकड्यांबद्दल बोलायचं झाल्यास आतापर्यंत 35.4 टक्के महिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर पुरुषांचं प्रमाण 64.6 टक्के आहे. राज्यनिहाय ही आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्र (Maharashtra), तामिळनाडू (tamilnadu), बिहार आणि झारखंडमध्ये सर्वाधिक महिला कोरोनाग्रस्त होत्या. गेल्या वर्षी सर्वात जास्त बिहारमध्ये महिलांना कोरोनाची लागण झाली होती. बिहारमध्ये 42 टक्के महिलांना कोरोनाचा संसर्ग (corona infection) झाला होता. तर महाराष्ट्रात 38 टक्के, कर्नाटकमध्ये 38 टक्के आणि तामिळनाडूमध्ये 32 टक्के महिलांना कोरोना झाला होता.

हे वाचा - Maharashtra fight back! कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट; दिलासादायक आकडेवारी

पण आता महिलांमधील कोरोनाचं वाढतं प्रमाण पाहता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते,  महिलांमध्ये संसर्ग वाढण्याचा अर्थ व्हायरसच्या स्वभावात बदल झाला आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिला कोरोना संबंधित नियमांचं (corona protocol) पालन जास्त चांगलं करतात. तसंच पुरुषांचं कामासाठी घराबाहेर जाण्याचं प्रमाण महिलांच्या तुलनेने जास्त असतं. मात्र ही आकडेवारी पाहता महिला आणि कमी वयातील लोकांनाही कोरोनाची लागण होत आहे, ही गंभीर बाब आहे.

ऑक्सिजनअभावी परिस्थिती बिकट

एप्रिलपासून देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सर्वात जास्त ऑक्सिजन (oxygen) आणि रेमडेसिवीरचा (Remedesivir) तुटवडा भासत आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर ऑक्सिजनचा पुरवठा आधीपेक्षा सुरळीत झाला आहे. पण समस्या अजून सुटलेली नाही. अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांचा जीव जात आहे. कोरोनाची लाट थोपवण्यासाठी जगभरातील अनेक देश भारताला ऑक्सिजन, औषधं आणि इतर वैद्यकीय सुविधांची मदत पुरवत आहेत.

हे वाचा - रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

तर दुसरीकडे तिसऱ्या टप्प्यात 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला (vaccination) सुरुवात झाली आहे. देशात कोविशिल्ड (Covishield), कोवॅक्सिन(covaxin) आणि रशियाच्या स्पुतनिक V (sputnik V) लशीला लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

First published: May 10, 2021, 8:27 PM IST

ताज्या बातम्या