पुणे महापालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.
2/ 13
सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत संचारबंदी. शुक्रवार संध्याकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 या काळात अत्यावश्यक कारण आणि सेवा वगळता घराबाहेर पडण्यास पूर्णत: बंदी
3/ 13
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध
4/ 13
संचारबंदीच्या कालावधीत उद्याने, सार्वजनिक मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, स्विमिंग पूल, क्रीडा संकुल, क्लब अशी मनोरंजन आणि करणणूक संबंधित बाबी पूर्णपणे बंद राहतील.
5/ 13
संचारबंदीच्या कालावधी सर्व दुकानं, मार्केट, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) पूर्णपणे बंद राहतील.
6/ 13
हॉटेल्, बार, रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 हॉटेलमधून पार्सल नेण्याची सोय आणि होम डिलिव्हरी सुरू असेल. शुक्रवार संध्याकाळी 6 ते सोमवार सकाळी 7 होम डिलीव्हरी मिळेल पण ग्राहकांना हॉटेलमधून पार्सल नेता येणार नाही.
7/ 13
धार्मिळ स्थळं पूर्णपणे बंद.
8/ 13
स्पा, ब्युटी पार्लर सलून पूर्णपणे बंद.
9/ 13
सामाजिक, राजकीय, सांस्कृति, धार्मिक कार्यक्रम जिथं खूप लोक जमतील असे कार्यक्रम बंद.
10/ 13
अंत्यसंस्काराला 20 लोक आणि लग्नसोहळ्यांना 50 लोकांची मर्यादा
11/ 13
पुणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळून 9 एप्रिल, 2021 पर्यंत पूर्ण बंद राहिल. खासगी वाहनसेवा अत्यावश्यक सेवा वगळून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 या कालावधीत सुरू. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 ते सकाळी 7 मध्ये पूर्णपणे बंद.
12/ 13
रिक्षामध्ये फक्त 2 प्रवाशांना परवानगी, टॅक्सी-कॅब किंवा खासगी गाडीत वाहन चालक पकडून फक्त 50% आसन क्षमतेस परवानगी.
13/ 13
बँक, दूरसंचार कंपनी, वीज कंपनी, विमा कंपनी, आयटी अशा आवश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता खासगी कार्यालये बंद राहतील सरकारी कार्यालये 50 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. कोव्हिडसंबंधी काम करणारी आस्थापना 100 टक्के क्षमतेसह सुरू राहतील.