जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बोअरवेल, विहिरीतील पाणी पित असाल तर सावधान! राज्यसभेत केंद्र सरकारची धक्कादायक कबुली

बोअरवेल, विहिरीतील पाणी पित असाल तर सावधान! राज्यसभेत केंद्र सरकारची धक्कादायक कबुली

बोअरवेल, विहिरीतील पाणी पित असाल तर सावधान! राज्यसभेत केंद्र सरकारची धक्कादायक कबुली

देशातील पाण्याचा दर्जा खालावत चालला आहे. केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले आहे की, देशातील जवळपास सर्व राज्यांतील जिल्ह्यांतील बहुतांश भागात भूजलामध्ये विषारी धातूंचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

  • -MIN READ Trending Desk New Delhi,New Delhi,Delhi
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : भारतातील बहुतांश राज्यांत गावागावांमध्ये आजही पिण्याचं मुबलक पाणी मिळत नाही. भर पावसाळ्यातही अनेक भागांत पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आहे. तर जिथं पाण्याची उपलब्धता आहे तिथं मात्र भूगर्भातील पाण्यात (Ground Water) विषारी घटक आढळल्याचं केंद्र सरकारनं राज्यसभेत सांगितलंय. त्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.

    देशात सर्वच राज्यांतील नागरिक विषारी पाणी पित आहेत. 209 जिल्ह्यांमध्ये भूगर्भातील पाण्यात अर्सेनिक (Arsenic) आणि 491 जिल्ह्यांतील पाण्यात लोहाचं (Iron) प्रमाण अधिक आढळलं आहे. याशिवाय शिसं (Lead), युरेनियम (Uranium), क्रोमियम (Chromium) आणि कॅडमिअमचं (Cadmium) प्रमाणही अधिक आढळलं आहे. नागरिक पित असलेलं पाणी विष असल्याची बाब केंद्र सरकारने राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. यात म्हटलं आहे की, 25 राज्यांतील 209 जिल्ह्यांत काही भागांमध्ये भूगर्भातील पाण्यात अर्सेनिकचं प्रमाण प्रतिलिटर 0.01 मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे. 29 राज्यांतील 491 जिल्ह्यांत काही भागांत लोहाचं प्रमाण प्रतिलिटर 1 मिलिग्रॅमपेक्षा जास्त आहे. तर 21 राज्यांतील 176 जिल्ह्यांत काही ठिकाणी शिसं 0.01 मिलिग्रॅमहून अधिक आहे. 11 राज्यांत 29 जिल्ह्यांत भूगर्भातील पाण्यात कॅडमिअमचं प्रमाण प्रतिलिटरमागे 0.003 पेक्षा अधिक आहे. 16 राज्यांतील 62 जिल्ह्यांत क्रोमिअमचं प्रमाण 0.05 मिलिग्रॅमहून जास्त आढळलं आहे. 18 राज्यांतील 152 जिल्ह्यांत काही भागांमधील पाण्यात युरेनिअम 0.03 मिलिग्रॅमपेक्षा अधिक आहे. दैनंदिन जीवनात एक व्यक्ती सरासरी 3 लिटर पाणी पिते. सरकारी कागदपत्रांनुसार, निरोगी राहण्यासाठी कमीतकमी 2 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती जर दररोज 2 लिटर पाणी पित असेल तर काही प्रमाणात विषही त्याच्या शरीरात जात आहे. भूगर्भातील पाण्यात अर्सेनिक, लोह, शिसं, कॅडमिअम, क्रोमिअम आणि युरोनिअमचं प्रमाण ठरवेलल्या मानकापेक्षा अधिक असेल तर त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होतो. अर्सेनिकचं प्रमाण जास्त झाल्यास त्वचेशी संबंधित आजार आणि कॅन्सरचा धोका वाढतो. शरीरात लोहाचं प्रमाण अधिक झाल्यास अल्झायमर आणि पर्किन्सन्ससारखे मज्जासंस्थेशी निगडीत (Nerve System) आजार होतात. त्याचवेळी पाण्यात शिसं जास्त झालं तर मज्जासंस्थेवर त्याचा परिणाम होतो. क्रोमिअमचं प्रमाण अधिक झालं तर छोट्या आतड्यांमध्ये ट्युमर होण्याचा धोका वाढतो. पाण्यात युरेनिअमचं प्रमाण अधिक झाल्यास किडनीशी निगडीत आजार व कॅन्सर होण्याचा अधिक धोका असतो. Alert! भारतात खतरनाक होतोय Monkeypox; 24 तासांत 2 धक्कादायक बातम्या देशातील 80 टक्के नागरिक पिताहेत विषारी पाणी जलशक्ती मंत्रालयाच्या एका दस्तऐवजानुसार, देशातील 80 टक्के नागरिकांना भूगर्भातील पाण्यावर त्यांची तहान भागवावी लागते; पण ठरवलेल्या प्रमाणापेक्षा या पाण्यात धातुंचं अधिक प्रमाण असल्याने ते एक प्रकारे विष बनत आहे. राज्यसभेत सरकारने पाण्याचे स्रोत दूषित झालेल्या रहिवासी भागांतील आकडेवारी सादर केली. त्यानुसार, 671 भागांत क्लोराइड, 814 भागांत अर्सेनिक, 14079 भागांत लोह, 9930 भागांत खारेपणा, 517 भागांत नायट्रेट आणि 111 भागांत जड धातू पाण्यात आढळतात. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात ही समस्या अधिक आहे. कारण इथे बहुतांश नागरिक हँडपंप, विहीर, नदी, तळ्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या ठिकाणी भूगर्भातील पाणी वापरण्याचं प्रमाण अधिक आहे. शिवाय पाणी शुद्धीकरणासाठी प्रक्रियाही अवलंबली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विषारी पाणी पिण्याशिवाय कुठलाही पर्याय उरलेला नाही. विषारी पाण्याच्या समस्येवर सरकारकडून प्रयत्न सुरू गावागावातील विषारी पाण्याचा विषय निघाल्यानंतर राज्यसभेत केंद्र सरकारने आपली बाजू मांडली. केंद्राच्या मते, पिण्याचं पाणी उपलब्ध करण्याची जबाबादारी राज्य सरकारची आहे. पण केंद्र सरकारकडूनही शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. 21 जुलै रोजी लोकसभेत यावर उत्तर दिलं गेलं. त्यानुसार 2019 मध्ये केंद्राकडून जलजीवन मिशन सुरू करण्यात आलं. या अंतर्गत 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. सध्या देशातील 19.15 कोटी ग्रामीण कुटुंबांपैकी 9.81 कोटी कुटुंबांपर्यंत नळाने पाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं. याशिवाय ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्र सरकारकडून अमृत 2.0 योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत पुढील 5 वर्षांत म्हणजेच 2026 पर्यंत सर्व शहरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचं लक्ष्य आहे, असंही सरकारने सांगितलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात