नवी दिल्ली, 01 ऑगस्ट : भारतात मंकीपॉक्स आता अधिक खतरनाक होतो आहे. 24 तासांत मंकीपॉक्सच्या दोन धक्कादायक बातम्या समोर आल्या आहेत. आज देशात मंकीपॉक्सने पहिला बळी घेतला तर आता आणखी एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. देशातील एकूण मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. दिल्लीत मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. रिपोर्ट नुसार 35 वर्षांच्या व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. हा रुग्ण नायजेरियातील आहे पण तो सध्या दिल्लीत राहतो. पण सध्या तो परदेश दौऱ्यावर गेलेला नाही. दिल्लीतील मंकीपॉक्सचा हा दुसरा रुग्ण आहे. याआधी दिल्लीत 34 वर्षाच्या रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झालेली आहे. या रुग्णाने कधीच परदेश प्रवास केलेला नाही. पण हिमाचल प्रदेशमधील मनालीत एका लग्नाच्या आदल्या दिवशी बॅचलर पार्टीला त्याने हजेरी लावली होती. परदेश प्रवास नसलेला देशातील हा पहिला रुग्ण आहे. केरळमध्ये 4 रुग्ण, एक बळी केरळच्या कोल्लममध्ये 14 जुलैला मंकीपॉक्सचं पहिलं प्रकरण समोर आलं. हाच भारतातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण. त्याला तीव्र ताप होता आणि त्याच्या शरीरावर चकत्या होत्या. 12 जुलैला तो यूएईहून भारतात आला. यूएईमध्ये एका मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाच्या संपर्कात तो आला होता. त्यानंतर 18 जुलैला कन्नूररमध्ये दुसरा रुग्ण आढळला. 31 वर्षाचा हा रुग्णही दुबईतून आला होता. 13 जुलैला तो दुबईहून परतला आणि त्यानंतर हळूहळू त्याच्यात लक्षणं दिसू लागली. त्याच्यातील लक्षणंही पहिल्या रुग्णासारखीच होती. तर 22 जुलैला आढळलेला मलाप्पुरमधील तिसरा रुग्णही यूएईमधून परतला आहे. 6 जुलैला तो यूएईहून भारतात आला, 13 जुलैला त्याच्यात लक्षणं दिसू लागली. हे वाचा - Monkeypox first death in India : भारतात मंकीपॉक्सचा पहिला बळी; 22 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू ज्या केरळमध्ये देशातील मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला त्याच केरळात मंकीपॉक्समुळे देशातील पहिला मृत्यू झाला आहे. मंकीपॉक्समुळे मृत्यू होणारा हा तरुण 22 जुलैला यूएईहून भारतात आला होता. त्यानंतर त्याच्या मंकीपॉक्ससारखी लक्षणं दिसून आली होती. 27 जुलैला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 जुलैला त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मंकीपॉक्सची लक्षणं शरीरावर पुरळ खूप ताप डोकेदुखी हे वाचा - ‘या’ राज्यात लंपी व्हायरसचा उद्रेक! 1200 हून अधिक जनावरे दगावली, ही आहेत लक्षणं स्नायू दुखणे अशक्तपणा लिम्फ नोड्स सुजणे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.