Home /News /lifestyle /

कंडिशनरमुळे केस सिल्की होतात, मात्र जाणून घ्या वापराची योग्य पद्धत!

कंडिशनरमुळे केस सिल्की होतात, मात्र जाणून घ्या वापराची योग्य पद्धत!

कंडिशनर योग्य प्रकारे कसा वापरावा?

    नवी दिल्ली, 2 जुलै : आपले केस घनदाट, लांबसडक असावेत आणि मुख्य म्हणजे ते चांगले दिसावेत असं प्रत्येक महिलेला वाटतं. चित्रपटात दाखवतात तशा सॉफ्ट आणि सिल्की केसांचं (Soft and Silky Hair) तर स्वप्न जवळपास प्रत्येक तरुणी पाहते. त्यासाठी काहीजणी तरी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपयेही खर्च करतात; पण तुम्ही जर केसांची घरीच थोडीशी काळजी घेतली (Hair Care) तर तुमचे केसही अगदी जाहिरातीत दाखवतात तसे मस्त सॉफ्ट आणि सिल्की होऊ शकतात. बाजारात केसांची काळजी घेण्यासाठीचे म्हणजेच हेअर केअर प्रॉडक्ट्स भरपूर मिळतात. हे प्रॉडक्ट्स कशी वापरायची हे नीट जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. शाम्पू केल्यानंतर वापरल्या जाणाऱ्या कंडिशनरबाबत (Shampoo and Conditioner) तर ही गोष्ट 100 टक्के खरी आहे. कंडिशनरचा वापर बहुतेक सगळ्याचजणी करतात. कंडिशनरचा वापर नेमका कसा केला की त्याचा जास्तीतजास्त फायदा होतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या कंडिशनरमुळे तुम्हाला फायदा होईल आणि केसही खराब होणार नाहीत. तुम्ही कोणत्या प्रकारचा कंडिशनर (Conditioner) वापरता यावर बरंच काही अवलंबून आहे. जर तुमच्या केसांचा व्हॉल्युम कमी असेल म्हणजे ते दाट नसतील तर व्हॉल्युमिनस कंडिशनरचा वापर करा. तुमचे केस कसे आहेत यावर कंडिशनरची निवड करा. कंडिशनर योग्य प्रकारे कसा वापरावा? (How To Use Right Conditioner?) - केस खूप जास्त ओले असताना कंडिशनर लावू नका. केस आधी थोडेसे कोरडे करा आणि मग त्यावर कंडिशनर लावा. - तुमचे केस किती मोठे आहेत, ते किती दाट आहेत हे लक्षात घेऊनच कंडिशनर लावा. म्हणजे त्या प्रमाणातच केसांना कंडिशनर लावणं गरजेचं आहे. खूप कमी किंवा खूप जास्त प्रमाणात कंडिशनर केसांना लावला तर त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. केसांच्या अगदी टोकाशीच कंडिशनर लावा. जे केस जास्त खराब झाले आहेत त्यांच्यावर कंडिशनर जास्त लावा. केसांच्या मुळाशी कंडिशनर लावू नका. कंडिशनर सगळ्या केसांमध्ये नीट पसरवा. त्यासाठी तुम्ही कंगवाही वापरू शकता. पण अगदी प्रत्येक केसाला कंडिशनर लागेल याची नक्की काळजी घ्या. - कंडिशनर लावल्यानंतर थोडा वेळ वाट पाहा. म्हणजे केसांमध्ये कंडिशनर चांगलं शोषलं जाईल. त्यानंतरच केस धुवा. - केस धुताना ते चिकट राहणार नाहीत याची खबरदारी घ्या. जोपर्यंत हा चिकटपणा निघून जात नाही तोपर्यंत केस धुवा. एकूणच तुम्ही वापरत असलेली हेअर केअर प्रॉडक्ट्स अगदी योग्य प्रकारे वापरलीत तर तुमचे केसही चांगले राहतील आणि तुमचे पैसेही वसूल होतील.

    First published:

    Tags: Beauty tips, Woman hair

    पुढील बातम्या