जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डिलिव्हरी अ‍ॅपवरुन मागवलेले पदार्थ खराब निघाले तर? तक्रार करुन मिळवा नुकसानभरपाई

डिलिव्हरी अ‍ॅपवरुन मागवलेले पदार्थ खराब निघाले तर? तक्रार करुन मिळवा नुकसानभरपाई

डिलिव्हरी अ‍ॅपवरुन मागवलेले पदार्थ खराब निघाले तर?

डिलिव्हरी अ‍ॅपवरुन मागवलेले पदार्थ खराब निघाले तर?

अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2005 अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अनेक तरतुदी आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 3 डिसेंबर : अनेकदा लोकांना वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड असते. वेगवेगळ्या प्रकारचं जेवण लोकांना आकर्षित करतं पण कधीकधी हे जेवण पोट बिघडवतं. डिलिव्हरी अ‍ॅपवरून मागवलेले पदार्थही खराब असतात. असं तुमच्या सोबाबतही झालं असेल की, तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला असाल पण तुम्हाला त्या रेस्टॉरंटची सेवा आवडली नसेल. अशावेळी तुम्हाला तुमचे अधिकार माहीत असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य ठिकाणी त्याबाबत तक्रार करता येईल. अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यात (Food Safety and Standards Act, 2005) ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासंदर्भात अनेक तरतुदी आहेत. जेवणाची गुणवत्ता वा सेवा संदर्भात काहीही गडबड वाटली तर तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता. कायदा काय म्हणतो? अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 मधील कलम 31 नुसार प्रत्येक रेस्टॉरंट मालकाला व्यवसाय चालवण्यासाठी एक खाद्य परवाना (Food License) काढणं अनिवार्य आहे. रेस्टॉरंट मालकाने नियुक्त अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करून परवान्यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. जर एखादा रेस्टॉरंट मालक विनापरवाना खाद्य व्यवसाय करत असेल तर त्यास सहा महिन्यांचा तुरुंगवास व जास्तीतजास्त पाच लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. वाचा - कोणत्या बिझनेसमध्ये तुम्हाला होईल नफा? राशीनुसार आर्थिक भविष्य पाहा अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 मधील कलम 54 नुसार जेवणात जर काही अनुचित पदार्थ आढळून आला तर त्याबाबतीत जास्तीतजास्त 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे. तसंच जर कोणी रेस्टॉरंट मालक अस्वच्छ स्वयंपाकघरात जेवण तयार करत असेल तर त्याबाबतीत 1 लाख रुपयांपर्यंत वेगळा दंड आकरला जाऊ शकतो. आपली तक्रार अशा प्रकारे नोंदवावी जर आपल्याला अशा प्रकारची जेवणाची सेवा मिळत असेल तर आपण खालील टप्प्यांनुसार आपली तक्रार नोंदवू शकता. टप्पा 1 - भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या fssai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

    News18लोकमत
    News18लोकमत

    टप्पा 2 - “Share your concern” बटणावर क्लिक करा आणि प्रथम स्वतःची नोंदणी करा. टप्पा 3 : नोंदणी केल्यानंतर, लॉग इन करा व संबंधित श्रेणी निवडा. जसं की पॅक केलेलं अन्न, रेस्टॉरंटचा परिसर इ. टप्पा 4 : श्रेणी निवडल्यानंतर, एक वर्णनात्मक फॉर्म समोर येईल, त्यामध्ये फोटोसहित सर्व तपशील नमूद करा. टप्पा 5 : शेवटी फॉर्म यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर एक संदर्भ क्रमांक आपल्याला मिळेल, जो तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , law
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात