मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

प्रोफेशनल लाईफमुळे पर्सनल लाईफवर होतोय परिणाम? या टिप्सचा होईल फायदा

प्रोफेशनल लाईफमुळे पर्सनल लाईफवर होतोय परिणाम? या टिप्सचा होईल फायदा

काम आणि वैयक्तिक आयुष्य याचा ताळमेळ (Balancing Professional and Personal life) राखणं खरोखरच जिकिरीचं काम असतं. घर चालवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि ऑफिसमधल्या ताण-तणावापासून (Office stress) दूर राहून घरी सुखाचे दोन क्षण व्यतीत करणंही गरजेचं आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 10 ऑगस्ट : काम आणि वैयक्तिक आयुष्य याचा ताळमेळ (Balancing Professional and Personal life) राखणं खरोखरच जिकिरीचं काम असतं. घर चालवण्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि ऑफिसमधल्या ताण-तणावापासून (Office stress) दूर राहून घरी सुखाचे दोन क्षण व्यतीत करणंही गरजेचं आहे. या दोन्हींपैकी एका गोष्टीवर जास्त लक्ष केंद्रित केलं, तर दुसऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. या सगळ्यात बऱ्याच जणांची तारांबळ उडते. तुम्हीदेखील अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये अडकले असाल, तर त्यातून बाहेर येण्यासाठी या काही टिप्स (Office Tips) जरूर अंमलात आणा. ऑफिसचं काम ऑफिसमध्येच सोडा हा सल्ला तुम्ही कित्येक वेळा ऐकला असेल, की ऑफिसचं काम (Don’t bring office stress to Home) कधीही घरी आणू नका. प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यात अंतर ठेवण्यासाठी दोन्हींच्या मध्ये एक लक्ष्मणरेषा आखणं गरजेचं आहे. एकीकडची गोष्ट दुसरीकडे जाऊ न देणं याची खबरदारी घ्या. ज्याप्रमाणे ऑफिसमधलं काम घरी न्यायचं नाही, त्याप्रमाणेच घरातल्या गोष्टीही घरातच (Don’t take home matters to office) ठेवणं गरजेचं आहे. त्यांचा तुमच्या कामावर परिणाम होऊ देऊ नका. वेळेचं योग्य नियोजन करा कोणतंही काम करण्यासाठी वेळेचं योग्य नियोजन अत्यावश्यक असतं. ऑफिसचं काम कितीही महत्त्वाचे असलं, तरी कुटुंबीय आणि मित्रांना वेळ (Give time to family and friends) देणं गरजेचं आहे. सोबतच तुमच्या जोडीदारासाठी विशेष वेळ (Take some time out for partner) काढणंही गरजेचं आहे. कित्येक वेळा अनेक जण इतरांसाठी वेगळा वेळ काढतात, मात्र जोडीदारासाठी विशेष वेळ काढत नाहीत; त्यामुळे संवादात दरी निर्माण होऊन घरात वाद वाढू शकतात. त्यामुळेच कुटुंबीय, मित्र आणि जोडीदार यांना पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न करा. घरात असताना तुम्ही तुमचा पूर्ण वेळ जोडीदाराला दिला तरी बरेच वाद टळू शकतात. मोबाइलवर वेळ व्यतीत करण्याऐवजी जोडीदाराशी गप्पा मारा. मित्रांसोबत काही प्लॅन ठरत असतील तर त्यात जोडीदाराला सहभागी करण्याचा प्रयत्न करा. मित्रांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहा. अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही ऑफिसच्या व्यतिरिक्त असणाऱ्या वेळेचा चांगला उपयोग करून घेऊ शकता. नको तेवढ्या जबाबदाऱ्या घेणं टाळा हे खरं तर दोन्ही ठिकाणी लागू होतं. ऑफिसमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यातही सर्व कामं तुम्हीच करायला हवीत (Stop taking unnecessary responsibilities) असं नाही. काही कामं इतरांनाही करण्याची संधी द्या. यामुळे तुम्हाला स्वतःसाठीदेखील वेळ देता येईल. यामुळे तुमची चिंता कमी होईल. तसंच तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कामाचा ताण नको असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या आवडीचं काम करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करता, तेव्हा तुमचं काम तुम्हाला ओझं वाटत नाही.
First published:

पुढील बातम्या