नवी दिल्ली, 18 जानेवारी : कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. तसेच थंडीच्या ऋतूमध्ये खोकला, सर्दी-पडसंही लगेच होतं आणि त्यामुळे कोरोनाची भीतीही सतावू लागते. अशा परिस्थितीत भारतीय आवळ्याचा आहारात समावेश करणे खूप फायदेशीर मानले जाते. आवळा व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटिऑक्सिडंट घटकांनी परिपूर्ण आहे, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपण आवळा पावडर (Amla Powder) बनवून साठवून ठेवली तर ती वर्षभर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. तुम्ही ही घरी सहज बनवू शकता. घरी बनवलेल्या आवळा पावडरचा फायदा म्हणजे त्यात भेसळ नसते आणि ती ताजी राहते. जाणून घेऊया घरच्या घरी बाजारासारखी बारीक पावडर (How To Make Perfect Amla Powder) कशी बनवता येईल.
आवळा पावडर घरी कशी बनवायची
पहिला प्रकार
तुम्ही बाजारातून ताजे 500 ग्रॅम आवळा विकत घ्या, 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवा. आवळा स्वच्छ झाल्यावर एका भांड्यात काढून घ्या आणि आता एका पातेल्यात 2 लिटर पाणी आणि आवळा टाकून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. आवळा चांगला उकळला की गॅसवरून उतरवा आणि थंड होण्यासाठी ठेवून द्या.
आवळा थंड झाल्यावर पाण्यातून बाहेर काढून वेगळा करा. आता आवळ्याच्या बिया काढून वेगळ्या करा आणि त्याचे छोटे तुकडे करा. कापलेले आवळ्याचे तुकडे 1-2 दिवस कडक सूर्यप्रकाशात पसरवा आणि कोरडे राहू द्या. हे तुकडे चांगले सुकल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर ते हवाबंद डब्यात साठवा.
हे वाचा -
Investment Options : यावर्षी ‘या’ तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय
दुसरा प्रकार
प्रथम आवळा स्वच्छ करून घ्या. नंतर एका भांड्यात पाणी आणि आवळा टाका आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. आवळा चांगला उकळला की मग मायक्रोवेव्ह बंद करा. आता आवळा पाण्यातून काढून वेगळ्या भांड्यात ठेवा. आवळा पूर्णपणे थंड झाल्यावर त्यातील बिया काढून टाका. आता आवळा उन्हात 2 ते 3 दिवस सुकवण्यासाठी ठेवा. आवळा चांगला सुकल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. सूर्यप्रकाश नसेल तर तुम्ही आवळा मायक्रोवेव्हमध्ये सुकवू शकता. तयार झालेली आवळा पावडर एअर टाईट डब्यात ठेवा.
आवळा पावडर अशा प्रकारे साठवा
तुम्हाला ही घरगुती आवळा पावडर महिनोंमहिने सुरक्षित ठेवायची असेल, तर तुम्ही ती काचेच्या बरणीत किंवा हवाबंद डब्यात साठवून ठेवावी. यामुळे ती दीर्घकाळ चांगली राहील.
हे वाचा -
Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती
वापरताना लक्षात ठेवा की त्यात पाण्याचा थेंब किंवा ओला चमचा टाकू नका.
शक्य असल्यास कधी-कधी ही पावडर उन्हात सुकवू शकता. यामुळे ती दीर्घकाळ टिकून राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.