वयाची विशी ओलांडल्यानंतर लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास सुरुवात होतो. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा एक पदार्थ असतो जो आपल्या शरीरातील पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो. परंतु जर शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असेल तर शरीर आपल्याला विविध प्रकारचे संकेत देत असत. तेव्हा हे संकेत नेमके कोणते आहेत हे जाणून घेऊयात. डोकेदुखी : तुम्हाला जर सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ही शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षण असू शकतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोक्यातील नसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या होतात. जाडेपणा : तुमचं वजन विनाकारण वाढू लागलं असेल तर ही देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षण आहेत. यासह तुम्हाला पोटात जडजड वाटत असेल, नेहमी पेक्षा जास्त घाम येत असेल किंवा अधिक गरम होऊ लागलं असं वाटत असेल तर कोलेस्ट्रॉल तपासून घायचा सल्ला डॉक्टर देतात. श्वास भरून येणे : कोलेस्ट्रॉल वाढल्या कारणाने जास्त काम न करताही थकवा जाणवतो. खासकरुन जाड लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. यावेळी श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. पण असे होत असेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल तपासून घेणे गरजेचे आहे.
हातापायांना झिणझिण्या, मुंग्या येणे : कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर नेहमी शरीरातील अंगांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. याकारणाने हाता-पायांना मुंग्या येणे, झिणझिण्या येणे अशा समस्या जाणवतात. काहीवेळा एकाच जागेवर अधिक वेळ बसल्यावर देखील हातापायांना झिणझिण्या येतात. पण जर असं न होता देखील तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील तर वेळीच कोलेस्ट्रॉलची लेव्हल तपासूण घ्यावी. Skin Care : त्वचेवर रोज लावा भेंडीचं पाणी, फरक पाहून विश्वास बसणार नाही छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटणे : कोलेस्ट्रॉल वाढल्याने मुख्य रुपाने हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तेव्हा जर तुम्हाला छातीत दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल अथवा हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त होत असतील तर अशावेळी कोलेस्ट्रॉल वाढल्याची शक्यता असते. तेव्हा या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका.