जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'हर फिक्र को धुवें मे उडाता चला गया'; 80 व्या वर्षी विशीतल्या उत्साहात जगले देव आनंद! या VIDEO मध्ये उलगडेल रहस्य

'हर फिक्र को धुवें मे उडाता चला गया'; 80 व्या वर्षी विशीतल्या उत्साहात जगले देव आनंद! या VIDEO मध्ये उलगडेल रहस्य

सकारात्मक दृष्टीकोनाचा पैलू सांगणारा ही मुलाखत तुम्ही पहाच.

सकारात्मक दृष्टीकोनाचा पैलू सांगणारा ही मुलाखत तुम्ही पहाच.

कसलंही टेन्शन (Tension) आलं असेल, मनात नकारात्मक विचार (Negative Thoughts) येत असतील देव आनंद यांची सिम्मी गरेवाल यांनी घेतलेली ही मुलाखत पाहाच. देवसाब यांनी 80 व्या वर्षांत उलगडलंय आनंदी जगण्याचं मर्म…

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 1 जुलै:चॉकलेट हिरो देव आनंद**(Chocolate Hero Dev ananda)यांच चैतन्याने सळसळतं व्यक्तीमत्व कोणीही विसरू शकत नाही. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर करून ठेवल्या आहेत. त्यांच्यातील सळसळत्या उत्साहाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. 3 डिसेंबर 2011ला या रोमान्सच्या बादशाहने जगाचा निरोप घेतला. पण, त्याआधी आपली प्रदीर्घ कारकिर्द (Long career) अशी रोखाटली की, त्याला आजही तोड नाही. 80 व्या वर्षातही ते विशीतल्या जोशात असायचे. त्यांनी आपली आत्मकथा देखील ‘रोमान्सिंग विद लाईफ’ (Romance with Life) या शीर्षकाने लिहून ठेवली आहे. त्यावरूनच ते आयुष्यावर किती प्रेम करायचे हे कळतं. पण, म्हणून ते कधी त्यात गुंतले नाहीत. तर, त्यांच्या जगण्यात सहजपणा होता. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाचा पैलू सांगणारा ही मुलाखत तुम्ही पहाच. सिम्मी गरेवाल(Actress Simmi Garewal)यांनी देव आनंद यांची मुलाखत घेतली होती. मीडिया पर्सन रवीना राज कोहली (Ravina Raj Kohli)** यांनी आपल्या फेसबूक (Facebook) पेजवरून त्याचा भाग शेअर केला आहे. ( सकाळचा चहा सोडा; रोज घ्या ‘या’ प्रकारे दूध; मायग्रेनचा त्रासही होईल बरा ) सिम्मी यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला देव आनंद यांनी खूप सहज सोपी उत्तर दिली आहेत. पण, त्यातून जणूकाही त्यांनी जीवनाचं सारच उलगडून सांगितलं आहे. मी अजूनही विशीत आहे असे ते हसहसत सांगतात. तेव्हा आपल्याही चेहऱ्यावर हसू येतं. सिम्मी विचारता आयुष्यात कसली भीती वाटते का? तेव्हा 80 वर्षे वयाचे देव आनंद म्हणातात, ‘कसलीच नाही, अगदी मृत्यूचीही नाही. कारण तो प्रत्येकाला येणार आहे’. मग गाईड सिनेमातल्या डायलॉगची आठवण करत म्हणतात. ‘ना दु:ख आहे, ना सुख, ना जग मीतर झोपलो आहे. एका वेगळ्या जगात माझे डोळे उघडलीत. तेव्हा, आपण कोण होतो याची आठवणही राहणार नाही. ( Veg की Nonveg : तुम्ही काय खाता, यावरही अवलंबून आहे कोरोनाचा धोका ) तुमच्या मागे राहिलेल्या जगाला त्याची आठवण राहिली असेल’. ते सिम्मी यांनाच म्हणता तुला कल्पना नाही तु आत्ता तुझ्याच प्रश्नांमधून मला किती शिकवते आहेस? तेव्हा तर, सिम्मी यांचे शब्दच ओले होतात. जणूकाही हा एव्हरग्रीन माणून आपल्यामधून कधीतरी खरच निघून जाईल या दु:खाची लकेर त्यांच्या शब्दा डोकावते. सिम्मी यांनी विचारलेल्या सगळ्यात मोठ दु:ख काय या प्रश्नावर ते म्हणातात, ‘समाजाला काहीच न देता केवळ ओझ बनून राहण्याइतकं वेदनादायी काही नाही’.

देव आनंद यांच्याप्रमाणे जगायचं असेल तर, काय करायला हवं असं सिम्मी यांनी विचारल्यावर ‘मै जिंदगीचा साथ निभाता चला गया… या त्यांच्याच गाण्याचा पंक्ती ते गुणगुणतात’. मुलगा आणि वडिलांमध्ये भांडण होतच असतात. ( भाग्यश्री पन्नाशीतही दिसते तितकीच सुंदर; Beauty secret सांगणारा तिचा VIDEO ) आपल्या वडिलांचा उल्लेख तर, ते ‘A man with Great Ego’ करतात. तेव्हाही त्यांच्या आत्मसन्मानाबद्दलचा आदरच झळकतो. ही मुलाखत एकदा नाही दहावेळा पहायची इच्छा प्रत्येकाला होईल. आयुष्याची सकारात्मक बाजू पहाण्यासाठी देव आनंद यांचे विचार ऐकायलाच हवेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात