Home /News /lifestyle /

चिनी संस्थेनंच केली चीनची पोलखोल; कोरोना प्रकरणाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप

चिनी संस्थेनंच केली चीनची पोलखोल; कोरोना प्रकरणाबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप

चीनमधील (china) संस्थेनं देशातील कोरोना प्रकरणांचा (china coronavirus) अभ्यास करून सत्य काय आहे ते समोर आणलं आहे.

    बीजिंग, 30 डिसेंबर : जगभरात कोरोनाव्हायरस  (Coronavirus) पसरण्याला चीनलाच (China) दोषी मानलं जातं आहे. अमेरिकेनं सर्वात आधी चीनवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले होतं आणि आता तर चीनमधील संस्थेनंच चीनवर आरोप केला आहे. कोरोना प्रकरणाबाबत चीननं खोटी माहिती दिली, असा दावा या संस्थेनं केला आहे. चीनमधील रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या (Chinese Centre for Disease Control and Prevention) संशोधकांनी चीनमधील कोरोना प्रकरणांचा अभ्यास केला. या संस्थेनं WeChat मार्फत ही माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार वुहान शहरात जवळपास 5% कोरोना संक्रमित असू शकता. या शहराची लोकसंख्या  1 कोटी  10 लाख आहे. अभ्यासानुसार वुहानमधील जवळपास 5 लाख लोक संक्रमित असू शकतात.  चीननं दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 50,354 प्रकरणं आहेत. याचा अर्थ प्रत्यक्षात वुहानमध्ये यापेक्षा दहापट अधिक रुग्ण आहेत. हे वाचा - रविवारी घेणार होते शपथ; त्याआधीच नवनिर्वाचित खासदाराचा कोरोनानं घेतला जीव संशोधकांनी हुबेई प्रांत, बीजिंग, शांघाई आणि इतर चार प्रांतामध्ये व्यापक स्तरावर हा अभ्यास केला. वुहानमधील 34,000 लोकांचे नमुने घेतले होते. वुहानमध्ये अँटिबॉडी प्रसाराचा दर हा 4.43% तर हुबेई प्रांतात 0.44% दिसून आला.  हुबेईबाहेर 12,000 लोकांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात फक्त दोन जणांच्या अँटिबॉडी टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चीनमध्ये कोरोनाची पहिली लाट आल्याच्या एक महिन्यानंतर हा अभ्यास करण्यात आला होता. हे वाचा - राज्यात दररोज सापडतायेत 500 नवे कोरोना रुग्ण; वाढत्या आकडेवारीमुळे टेन्शन वाढलं चीनमध्ये कोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांची नोंद केली जात नाही आहे. त्यामुळे जगासमोर दिली जाणारी सरकारी आकडेवारी खोटी आहे हे स्पष्ट होतं.  पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची टीम चीनमधील कोरोनाची तपासणी करण्यासाठी बीजिंगमध्ये जाणार आहेत. अशा स्वतंत्र तपासाला परवानगी देण्यासाठी चीन इच्छुक नाही. चीनच्या कोरोनाच्या आकडेवारीवर आधीपासूनच संशय व्यक्त केला जातो आहे. या आकडेवारीवर विश्वास ठेवू शकत नाही, असं अनेकांच म्हणणं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Coronavirus

    पुढील बातम्या