मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तरुण मुलाला अल्झायमर? संशोधक घेतायत आनुवंशिक कारणांचा शोध

तरुण मुलाला अल्झायमर? संशोधक घेतायत आनुवंशिक कारणांचा शोध

वृद्ध व्यक्तींमध्ये अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार दिसून येतात. पण चीनमध्ये एका 19 वर्षाच्या मुलाला अल्झायमर झाला असावा असं संशोधकांना वाटत आहे.

वृद्ध व्यक्तींमध्ये अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार दिसून येतात. पण चीनमध्ये एका 19 वर्षाच्या मुलाला अल्झायमर झाला असावा असं संशोधकांना वाटत आहे.

वृद्ध व्यक्तींमध्ये अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार दिसून येतात. पण चीनमध्ये एका 19 वर्षाच्या मुलाला अल्झायमर झाला असावा असं संशोधकांना वाटत आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  दिल्ली, 27 मार्च : बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना मानसिक ताण-तणावांचा सामना करावा लागत आहे. कामाचा वाढता ताण, कौटुंबिक, व्यावसायिक जबाबदाऱ्यांसह विविध कारणांमुळे मानसिक तणाव वाढताना दिसत आहे. यामुळे मानसिक आजार होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. खरंतर वृद्ध व्यक्तींमध्ये अल्झायमर, डिमेन्शियासारखे आजार दिसून येतात. पण चीनमध्ये एका 19 वर्षाच्या मुलाला अल्झायमर झाला असावा असं संशोधकांना वाटत आहे. संशोधकांनी या अनुषंगानं या मुलाच्या अनेक तपासण्यादेखील केल्या आहेत. सुरुवातीच्या तपासण्यांमध्ये त्याला डिमेन्शिया झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण हा अल्झायमरचा रुग्ण असू शकतो, असा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे, ते जाणून घेऊया.

  डिमेन्शिया हा असा आजार आहे की त्यामुळे रुग्णाची विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता हळूहळू संपुष्टात येते. डिमेन्शियामुळे रुग्णाच्या स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होतो आणि तो प्रत्येक गोष्ट विसरू लागतो. या शिवाय हा आजार झालेल्या व्यक्तीला रोजची कामं करण्यातदेखील अडचणी येतात. वयापरत्वे ही समस्या वाढत जाते. सर्वसामान्यपणे डिमेन्शियाचा धोका 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांमध्ये जास्त असतो. पण चीनमध्ये नुकतीच यासंबंधित एक केस समोर आली आहे. ही केस काहीशी धक्कादायकच म्हणावी लागेल.

  चीनमधील 19 वर्षाच्या मुलाला वयाच्या 17 व्या वर्षी स्मृतीभ्रंश झाला. तपासणीअंती त्याला डिमेन्शिया हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले. नुकताच `जर्नल ऑफ अल्झायमर्स डिसीज`मध्ये प्रकाशित झालेल्या एका केस स्टडीमध्ये याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे. बीजिंग येथील कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अनेक प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर या मुलाला अल्झायमर झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. जर हे सिद्ध झालं तर हा मुलगा अल्झायमरचा सर्वात तरुण रुग्ण ठरेल.

  वय आणि उंचीनुसार वजन किती असावं? योग्य वजन कसं ठरवावं? 

  दरम्यान, वयाच्या 17 व्या वर्षापासून या मुलाला शाळेत शिक्षण घेताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं अवघड जात होतं. त्यानंतर एक वर्षानं त्याची शॉर्ट टर्म मेमरी हळूहळू कमी होत गेली. हळूहळू त्याची स्मरणशक्ती इतकी कमकुवत झाली की त्याला नाइलाजानं शाळा सोडावी लागली.

  अल्झायमरच्या नेमक्या कारणांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु, हा आजार मेंदूतील बीटा अ‍ॅमिलॉइड आणि टौ (TAU) हे दोनं प्रथिनं तयार झाल्यामुळे होतो, असं मानलं जातं. सामान्यतः अल्झायमरच्या रुग्णांमध्ये न्युरॉन्सच्या (मेंदू्च्या पेशी) बाहेरील बाजूस बीटा अ‍ॅमिलॉइड मोठ्या प्रमाणात आढळतात आणि टौचे समूह अ‍ॅक्सन्सच्या आत आढळतो.

  युवकांना अल्झायमर होण्यामागे प्रामुख्याने तीन जनुकं कारणीभूत असतात. यात अ‍ॅमिलॉइड प्रीक्युअरसॉर प्रोटिन (एपीपी), प्रीसेनिलिन 1 (पीएसईएन 1) आणि प्रेसेनिलिन 2 (पीएसईएन 2) या जनुकांचा समावेश असतो. ही जनुकं बीटा - अ‍ॅमिलॉइड पेप्टाइड नावाच्या प्रोटिन निर्मितीत गुंतलेली असतात.जर जनुक सदोष असेल तर अशा स्थितीत मेंदूमध्ये बीटा-अ‍ॅमिलॉइड असामान्यपणे जमा होऊ लागते. अल्झायमर रोग विकसित होण्यासाठी फक्त एपीपी, पीएसईएन1, पीएसईएन 2 यापैकी एका आवश्यक असतं.अल्झायमर असलेल्या रुग्णाच्या मुलांना त्याच्याकडून ही जनुकं वारसा म्हणून मिळण्याची आणि हा आजार होण्याची शक्यता 50-50 टक्के असते.

  केस धुतल्यानंतर टॉवेल गुंडाळणे ठरू शकते घातक! तज्ज्ञांनी सांगितले 5 मोठे नुकसान

  तपासणीदरम्यान संशोधकांनी या 19 वर्षांच्या मुलाच्या मेंदूचं स्कॅनिंग केलं. या वेळी त्याच्या मेंदूत अशी कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. पण स्कॅनवेळी या मुलाच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लूइडमध्ये पी- टौ 181 नावाच्या प्रोटीनची पातळी असामान्य पद्धतीने वाढली असल्याचे दिसून आलं. ही गोष्ट मेंदूमध्ये टौ टँगल्स तयार होण्यापूर्वी होते. 30 वर्षांखालील लोकांमध्ये अल्झायमर होण्यास अनुवंशिक सदोष जनुक कारणीभूत ठरते. खरंतर यापूर्वी देखील एका 21 वर्षाच्या मुलाला अल्झायमर झाल्याचे स्पष्ट झाले होते. सदोष जनुक हे या मागील मुख्य कारण होते.

  दरम्यान, या केसमध्ये अनुवंशिक कारणाचा मुद्दा संशोधकांनी फेटाळून लावला आहे. कारण संशोधकांनी या मुलाच्या जीनोम सिक्वेन्सचा संपूर्ण अभ्यास केला. यामुळे अनुवंशिक बदल शोधून काढण्यात त्यांना अपयश आले. याशिवाय या मुलाच्या कुटुंबात अल्झायमर किंवा डिमेन्शियाचा इतिहास नसल्याचे समोर आले. तसेच या मुलाला कोणताही इतर आजार, संसर्ग किंवा ट्रामा नव्हता जेणेकरून अशी स्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत हे स्पष्ट होतं की त्याला अल्झायमरचा कोणताही प्रकार असला तरी तो फारच दुर्मिळ आहे.

  First published:
  top videos

   Tags: Health