मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वय आणि उंचीनुसार वजन किती असावं? योग्य वजन कसं ठरवावं?

वय आणि उंचीनुसार वजन किती असावं? योग्य वजन कसं ठरवावं?

Ideal Weight Height Ratio

Ideal Weight Height Ratio

आपल्या शरीरासाठी योग्य वजन किती हे कळल्यास लठ्ठपणा दूर करता येऊ शकतो; मात्र तसं न केल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 27 मार्च:   लठ्ठपणा ही वेगानं वाढणारी समस्या आहे. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व स्तरांतल्या व्यक्तींमध्ये लठ्ठपणा आढळून येतो. शरीराचं वाढलेलं वजन लठ्ठपणा सूचित करतं; मात्र किती वजन योग्य आहे, चरबीचं प्रमाण व बीएमआय यांचे निकष कितपत योग्य आहेत, उंची व वयानुसार किती वजन असावं, याबाबत नेमकी माहिती मिळत नाही. त्याबद्दल तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ या. 'आज तक'ने त्याबाबत माहिती देणारं सविस्तर वृत्त दिलं आहे.

    वजन किती असावं याचे खरं तर ठोस निकष नाहीत; मात्र अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीची उंची व वय यावरून त्याचं वजन किती असावं असा ढोबळमानानं अंदाज बांधता येतो. काही तज्ज्ञांच्या मते, जीवनशैली, शरीराची ढब, दिनचर्या यावरून योग्य वजनाचा अंदाज ठरवता येऊ शकतो. थोडक्यात, आपलं वजन किती असावं हे लक्षात आलं, तर लठ्ठपणाशी संबंधित अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. दिल्लीच्या बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या इंटर्नल मेडिसीन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरविंद अग्रवाल यांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीरासाठी योग्य वजन किती हे कळल्यास लठ्ठपणा दूर करता येऊ शकतो; मात्र तसं न केल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

    हेही वाचा - केस धुतल्यानंतर टॉवेल गुंडाळणे ठरू शकते घातक! तज्ज्ञांनी सांगितले 5 मोठे नुकसान

     बीएमआयची पद्धत कितपत योग्य?

    शरीराच्या उंचीवरून वजन किती असावं हे मोजण्यासाठी बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्सचा वापर केला जातो. बीएमआय 18.5पेक्षा कमी असेल, तर वजन कमी मानलं जातं. बीएमआय 18.5 ते 24.9 यांदरम्यान असेल, तर ते आदर्श वजन असतं. 25 ते 29.9 बीएमआय असल्यास जास्त वजन म्हणतात, तर 30च्या पेक्षा जास्त बीएमआय असेल तर त्या व्यक्तीला लठ्ठ समजलं जातं. मुंबईच्या भाटिया रुग्णालयातल्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे सल्लागार डॉ. अभिषेक सुभाष यांच्या मते बीएमआय पद्धत चुकीची आहे. अमेरिकेतल्या सीडीसीसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनीही या पद्धतीवर फारसं अवलंबून राहू नये असा सल्ला दिला आहे. बीएमआय पद्धतीमध्ये वजनाचे निकष लावताना स्नायूंवरची चरबी, हाडांची घनता, शरीराची संपूर्ण रचना, लिंग याबाबत विचार होत नाही, असं डॉ. सुभाष यांचं म्हणणं आहे. त्यामुळे फिटनेसवर लक्ष द्यावं. दैनंदिन काम करताना थकवा जाणवतो आहे का हे पाहावं, असं त्यांनी सांगितलं आहे.

    आपल्या उंचीनुसार योग्य वजन काय असतं, तसंच वयानुसारही किती वजन असावं, याबाबत डॉ. अरविंद यांनी माहिती दिली आहे.

    उंची वजन

    •  4 फूट 10 इंच 41–52 किलो
    •  5 फूट 44–55.7 किलो
    •  5 फूट 2 इंच 49–63 किलो
    •  5 फूट 4 इंच 49–63 किलो
    •  5 फूट 6 इंच 53–67 किलो
    •  5 फूट 8 इंच 56–71 किलो
    •  5 फूट 10 इंच 59–75 किलो
    •  6 फूट 63–80 किलो

    वय (वर्षं) लिंग वजन

    • 19-29 पुरुष 83.4 किलो
    •  स्त्रिया 73.4 किलो
    •  30-39 पुरुष 90.3 किलो
    •  स्त्रिया 76.7 किलो
    •  40-49 पुरुष 90.9 किलो
    •  स्त्रिया 76.2 किलो
    •  50-60 पुरुष 91.3 किलो
    •  स्त्रिया 77.0 किलो

    बीएमआयऐवजी शरीरातली चरबी मोजून लठ्ठपणा आहे की नाही हे ठरवणं अधिक योग्य असल्याचं अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या सप्टेंबर 2000मधल्या एका अभ्यासात म्हटलं आहे. मेडिकल न्यूज टुडेच्या माहितीनुसार, शरीरातल्या चरबीवरून शरीराची रचना लक्षात येते. त्यामुळे चरबीचं प्रमाण किती टक्के आहे, यावरूनच फिटनेस ठरवणं योग्य असतं. उंची, वजन, वय आणि बीएमआय एकसारखा असणाऱ्या दोन व्यक्तींच्या शरीरातली चरबी आणि स्नायूंमध्ये फरक असू शकतो, असं मुंबईच्या सैफी रुग्णालयातल्या शल्यचिकित्सक डॉ. अपर्णा यांचं मत आहे.

    एकंदरीत, तज्ज्ञांच्या मते बीएमआय किंवा उंची यांच्यानुसार वजनाचे निकष न ठरवता, आपल्या शरीराचा फिटनेस व ऊर्जा यांवरून ते ठरवणं योग्य असतं.

    First published:
    top videos

      Tags: Lifestyle