आरोग्याची काळजी घेत असताना अनेक लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दातदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. दातांची निगा न राखल्याने ते किडतात. त्यामुळे होणाऱ्या वेदना आणि नंतर अन्न खाणंही कठिण होतं. दातदुखीवर सुरुवातीलाच काही घरगुती उपाय केले तर त्यातुन सुटका होऊ शकते. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात घासले पाहिजेत. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहतील. त्याशिवाय घरात रोजच्या आहारात असलेल्या काही पदार्थामुंळेही दात निरोगी राखता येतील. कांदा – कांदा हा एक नैसर्गिक औषध म्हणून वापरला जातो. दातातील कीड घालवण्यासाठी कांद्याचा उपयोग लाभदायक ठरतो. त्यामुळे दात असलेले किडे निघून जातात. **हिंग –**घरातील मसाल्यांच्या पदार्थामध्ये हिंग असतो. त्या हिंगाची पावडर पाण्यात उकळावी. ते पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने चूळ भरा. दात किडले असतील तर त्यात हिंगाची पावडर धरा त्यामुळे किड मरेल. मोहरीचे तेल - या तेलात अनेक औषधी गुणधर्म आढळतात. याचाही वापर दातदुखीसाठी उपयुक्त ठरतो. दातांना किड असेल तर मीठ, हळद आणि मोहरीचं तेल एकत्रित करून त्याचं थोडं मिश्रण दातांवर लावा. लसूण - फोडणीसाठी वापरला जाणारा लसूणही दातदुखीसाठी उपायकारक आहे. यामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी फंगल हे गुणधर्म असतात. लसूण सोलून त्याची एक पाकळी सैंधव मिठात घोळून ज्या दातात किड आहे तिथं धरा. एक-दोन मिनिटे लसूण तसाच ठेवा. यामुळे दातात होणाऱ्या किडीपासून सुटका होईल. जायफळ तेल - हे तेल किडलेल्या दातांसाठी उपयुक्त आहे. एक कापसाचा गोळा या तेलात बुडवून दुखत असेलेल्या दाताखाली पाच मिनिटांसाठी ठेवायचा. तो काढल्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या केल्यास दातातील किड नाहीशी होते. घरगुती उपाय हे दातदुखी प्राथमिक अवस्थेत असताना केल्यास फायदेशीर ठरतात. तसेच डॉक्टरकडे जाईपर्यंत दातांमध्ये होणाऱ्या वेदना थांबवण्यासाठी या उपचारांची मदत होते. दात अधिक दुखत असतील किंवा दात जास्त खराब झाले असतील तर डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेणे योग्य ठरेल. तुम्ही सुरुवातीला जरी डॉक्टरांकडे गेलात तर ते याबाबत मार्गदर्शन करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.