मुंबई, 26 जून : आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ होते. आचार्य चाणक्यांनी माणसाच्या रोजच्या जीवनातील अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यानुसार आपण वागलो तर आपल्या आयुष्यातील अडचणी आणि टेन्शन अर्ध्यापेक्षा जास्त कमी होईल. चाणक्य नीती मधून आचार्य चाणक्य यांनी शांत आणि आनंदी जीवन जगण्याचे काही मंत्र देले आहेत. चाणक्य नीती भारतातच काय तर जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक लोक याचे पालन करतात. इथे अनेक सामान्य सांसारिक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्याने जीवनातील अनेक अडचणी टाळता येतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जे चाणक्य यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीति ग्रंथात कोणत्या प्रकारच्या लोकांना नेहमी दूर ठेवावे, याविषयी सांगितले आहे. चाणक्यने सांगितले आहे की, काही लोक असे असतात, त्यांना तुम्ही दूरच ठेवलेले बरे. अशा लोकांचे जवळ रहाणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. आयुष्यात कोणत्या प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे, याविषयी त्यांनी दिलेली माहिती पाहुया. निर्लज्ज लोकांपासून दूर रहा आचार्य चाणक्य म्हणतात की, निर्लज्ज लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा लोकांना त्यांच्या इज्जतीची पर्वा नसते. इतरांच्या इज्जतीचीही त्यांना पर्वा नसते. अशा लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तीचा अपमानही होऊ शकतो. जर तुम्ही स्वत: तुमच्या इज्जतीची काळजी घेतली नाही, तर समाजात तुम्हाला कोणी इज्जत देणार नाहीय वाईट लोकांपासून दूर रहा आचार्य चाणक्य म्हणतात की, चुकीची कामे करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांसोबत राहिल्यास तुमचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे चुकीची कामे करणाऱ्यांसोबत राहिल्याने तुमचा आदरही कमी होईल. दुसरे, तुम्ही कधीतरी यामध्ये वाईटरित्या अडकू शकता. इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून दूर राहा इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा लोकांसोबत राहिल्याने तुमचे नुकसानच होईल. चाणक्य म्हणतात की, जे मोठ्यांचा आदर करत नाहीत आणि लहानांवर प्रेम करत नाहीत त्यांच्यासोबत राहणे चांगले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.