मुंबई 8 नोव्हेंबर : लोक आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नीति ला फॉलो करतात, इतकच नाही तर त्यांच्या या गोष्टी लोक आपल्या रोजच्या जीवनात आत्मसाद करतात. चाणक्य नीतिमध्ये नवरा बायकोच्या नात्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, पत्नीने आपल्या पतीची ही मागणी नेहमी पूर्ण केली पाहिजे, ज्यामुळे नवरा-बायकोचं हे नातं फुलण्यासाठी फायदा होतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितलं की, पत्नीने आपल्या पतीची काळजी घेतली पाहिजे, त्याला काय हवयं नको ते पाहिलं पाहिजे, तसेच नवऱ्याला शारीरिक सुख देखील दिलं पाहिजे, कारण या शिवाय तसंही नवरा बायकोचं वैवाहिक जीवन यशस्वी होत नाही आणि नात्यात दुरावा येतो. एवढंच काय तर यामुळे नवरा कधीही बायकोला सोडून दुसऱ्या महिलांकडे वळणार नाही. हे ही पाहा : Chanakya Niti : सतत पराभव होत असेल तर ही गोष्ट करा, यश नक्की मिळेल नीतीशास्त्रात सांगितले आहे की जर नवरा दुःखी असेल तर बायको आपोआप दुःखी होते. नवरा आनंदी असेल तर बायकोच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते. आचार्य चाणक्य म्हणतात की सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमधील प्रेम खूप महत्वाचे आहे. तसे झाले नाही तर नाते तुटते. जर नवरा दुःखी असेल तर बायकोने दुःखाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच नवरा रागावला, तर त्याला समजून घ्यावं आणि त्याला अशावेळी शांत व्हायला थोडा वेळ द्यावा. घरचा ताप किंवा त्रास त्यावेळेसाठी त्याला देऊ नये.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे की जर पती आनंदी असेल, तर पत्नी देखील आनंदी असेल आणि घरगुती जीवन आनंदी असेल. तसेच जर नवऱ्याला बायकोकडून प्रेमासाठी काही अपेक्षा असेल तर तिने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.