नवी दिल्ली, 08 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona second wave) लहान मुलांना (Coronavirus in children) कोरोना संसर्ग झाल्याची प्रकरणं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही (Corona third wave) लहान मुलांना अधिक धोका (Corona infection in children) असेल का अशी चिंता सतावते आहे. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान लहान मुलांच्या कोरोनाबाबत दिलासादायक अशी बातमी येते आहे. केंद्र सरकारने देशातील लहान मुलांच्या कोरोना प्रकरणांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी कोरोना संक्रमित मुलं सापडली आहेत, त्यांना एकतर दुसरा दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. शिवाय मुलांना तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
No data, global or Indian, has had any observations of children being affected more. Even in the 2nd wave kids who were infected had mild illness or co-morbidities. I don't think we will have a serious infection in children in the future: Dr Randeep Guleria, AIIMS Director pic.twitter.com/q4w7ceurDr
— ANI (@ANI) June 8, 2021
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोरोनाचा लहान मुलांना सर्वाधिक फटका बसला आहे, असा कोणताही भारतीय किंवा जागतिक डेटा नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या डेटानुसार ज्या कोरोना संक्रमित मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यापैकी 60-70% मुलांना इतर दीर्घकालीन आजार आहे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. हे वाचा - डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन लहान मुलांना तिसऱ्या लाटेचा धोका सर्वात जास्त असेल, असा अद्याप काही पुरावा नाही. त्यामुळे भविष्यात मुलांसाठी कोरोना जास्त धोकादायक ठरू शकतो, असं मला वाटत नाही, असंही गुलेरिया यांनी सांगितलं.