मुंबई, 16 मार्च : देशात आणि जगात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होणाऱ्या होळीची तयारी अनेक महिने आधीच सुरू होते. भारतात फाल्गुन महिना येण्यापूर्वीच लोक घराची साफसफाई करण्यास सुरुवात करतात. यासोबतच होळीचा सणही काही आठवडे आधीच सुरू होतो. भारतात रंगांच्या सणाचे महत्त्व काय आहे? हे कोणाला समजावून सांगण्याची गरज नाही. होळी हा रंगांचा सण पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत लोकांमध्ये चांगला रुजला आहे, पण या रंगांच्या सणात पांढऱ्या कपड्यांचेही (White Clothes) वेगळे महत्त्व आहे. होळीच्या सणाला पांढरे कपडे घालण्याची अनेक कारणे आहेत, ज्यांचा थेट संबंध ज्योतिषाशी आहे.
यावर्षी होलिका दहन हा सण 17 मार्च 2022 रोजी साजरा केला जाईल तर 18 मार्च 2022 रोजी रंगांची होळी खेळली जाईल. आनंदाच्या आणि उत्साहाच्या या सणाला लोक एकमेकांना रंग लावतात आणि गळाभेट घेत होळीच्या शुभेच्छा देतात. अनेकजण होळीला पांढरे कपडे घालून होळी खेळतात. आजकाल फक्त फॅशनच्या निमित्ताने होळीला पांढरे कपडे परिधान केले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की ज्योतिष शास्त्रानुसार होळीच्या दिवशी पांढरे कपडे घालणे खूप महत्वाचे आहे, चला जाणून घेऊया पांढऱ्या कपड्यांवर रंग खेळण्याचा अर्थ काय आहे.
काय सांगता? माणूस दीर्घायुषी होणार! झेनोट्रांसप्लांटेशन क्रांती आणणार?
होळीच्या दिवशी पांढरे कपडे घालण्याचे महत्त्व काय?
होळीच्या दिवशी पांढरे कपडे परिधान केल्याने जीवनात सकारात्मकता येते, अशी लोकांची धारणा आहे.
पांढरा रंग बंधुभाव, शांती, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे, असे मानले जाते, त्यामुळे या दिवशी पांढरे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
होळीचा सण सुद्धा इतर सणांप्रमाणेच आनंद घेऊन येतो. मात्र, या सणाला लोकं तक्रारी विसरून एकमेकांना आलिंगन देत असल्याने त्याचे महत्त्व खूप वाढते.
यावेळी होळीच्या दिवशी खास योग येत आहे. हा बुध-गुरुआदित्य योग मानला जातो. हा योग अनेक वर्षांनी तयार होतो.
पांढऱ्या कपड्याला स्वतःचा रंग नसतो. पांढऱ्या कपड्यावर कोणताही रंग लावला तरी तो त्याचा रंगाचा होतो.
होलिका दहनाच्या दिवशीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून होलिका दहन केले तर ते खूप शुभ मानले जाते.
पांढऱ्या रंगाचे कपडे देखील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतात. याशिवाय यामुळे बिघडलेली कामेही होतात, असे सांगितले जाते.
उन्हाळ्यात पांढर्या रंगाचे कपडे घालणे चांगले मानले जाते. होळीचा सण उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतो. अशावेळी पांढरा रंग शरीराला थंडावा देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: होळी