Home /News /lifestyle /

दीपिका पदुकोणला अचानक रुग्णालय गाठावं लागलं; हृदयाचे ठोके वाढणे हलक्यात नका घेऊ

दीपिका पदुकोणला अचानक रुग्णालय गाठावं लागलं; हृदयाचे ठोके वाढणे हलक्यात नका घेऊ

कधीकधी हृदयाचे ठोके वाढणे, चिंताग्रस्त होणे किंवा अस्वस्थ वाटणे हे देखील हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होते. वैद्यकीय परिभाषेत हृदयाची गती वाढणे याला हार्ट अॅरिथमिया असे म्हणतात.

    नवी दिल्ली, 17 जून : अलीकडेच अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दीपिका पदुकोण हैदराबादमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढले आणि अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, रुग्णालयात उपचारानंतर दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. कधीकधी हृदयाचे ठोके वाढणे, चिंताग्रस्त होणे किंवा अस्वस्थ वाटणे हे देखील हृदयाशी संबंधित समस्यांमुळे होते. आपल्या हृदयाचे ठोके वारंवार वाढत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हृदय गती का वाढते, त्याची कारणे आणि या समस्येवर मात करण्याचे उपाय जाणून घेऊया. हृदयाचे ठोके वाढल्यामुळे - वैद्यकीय परिभाषेत हृदयाची गती वाढणे याला हार्ट अॅरिथमिया असे म्हणतात. MayoClinic मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, हृदयाची गती किंवा हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे (Heart palpitations) वाढले तर ते काहीवेळा तणाव, व्यायाम, विशिष्ट औषधाचे सेवन यामुळे होते. किंवा ते एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे देखील होऊ शकते. तथापि, काही प्रकरणांमध्ये हृदयाचे ठोके वाढणे चिंताजनक असू शकते. हे गंभीर हृदयरोगाचे लक्षण देखील असू शकते, म्हणजे अनियमित हृदयाचे ठोके (अॅरिथमिया), ज्यासाठी रुग्णालयात उपचार आवश्यक असू शकतात. हृदय गती वाढण्याची लक्षणे - - खूप वेगात हृदयाचे ठोके पडणे - हृदयाचे ठोके चुकणे - जलद धडधड जाणवणे - हृदयाचे ठोके वाढल्याने चिंताग्रस्त, अस्वस्थ वाटणे हृदय धडधडण्यामागील जोखीम घटक - - ताण - चिंता किंवा पॅनीक अटॅक - गर्भधारणा - काही औषधे जसे की दम्याचे औषध - हायपरथायरॉईडीझम हृदयाच्या इतर समस्या, जसे की अनियमित हृदयाचा ठोके, पूर्वी हृदयविकाराचा झटका किंवा हृदय शस्त्रक्रिया हृदय गती वाढल्यामुळे - तणाव, चिंता आणि पॅनीक अटॅक - नैराश्य - सातत्यपूर्ण जड व्यायाम -कॅफिन, निकोटीन, थंड औषधांचे सेवन - ताप येणे - मासिक पाळी, रजोनिवृत्ती, गर्भधारणा - थायरॉईड संप्रेरक वाढणे किंवा कमी होणे हे वाचा - मुलांच्या मेंटल ग्रोथसाठी या टिप्स आहेत उपयोगी; लहान असल्यापासूनच होईल फायदा डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा - जर तुमची हृदय गती किंवा धडधड अधूनमधून होत असेल आणि फक्त काही सेकंद टिकत असेल, तर सहसा डॉक्टरांना भेटण्याची गरज नसते. मात्र, तुम्हाला पूर्वीपासून हृदयविकार असल्यास आणि वारंवार किंवा जलद हृदयाचे ठोके पडत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे शक्य आहे की टेस्टनंतर तुम्हाला हृदय निरीक्षण चाचणीची आवश्यकता असेल, जेणेकरुन हे कळू शकेल की तुम्हाला हृदयाची कोणतीही गंभीर समस्या नाही, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात किंवा कमी होतात. हे वाचा - डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचा अर्थ काय? धार्मिक आणि वैज्ञानिक कारण समजून घ्या हृदयाच्या ठोक्यादरम्यान या समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांना भेटा - छातीत अस्वस्थता किंवा वेदना - मूर्च्छित होणे - दम लागणे - तीव्र चक्कर येणे (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Heart Attack, Heart risk, Heartbreaking

    पुढील बातम्या