मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Throat Pain While Crying : रडताना आपल्या घशामध्ये वेदना का होतात?

Throat Pain While Crying : रडताना आपल्या घशामध्ये वेदना का होतात?

रडताना किंवा हसताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्याचवेळी आपल्या घशात वेदनाही जाणवतात. या वेदना फार जास्त नसतात. मात्र असं का होत असावं?

रडताना किंवा हसताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्याचवेळी आपल्या घशात वेदनाही जाणवतात. या वेदना फार जास्त नसतात. मात्र असं का होत असावं?

रडताना किंवा हसताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्याचवेळी आपल्या घशात वेदनाही जाणवतात. या वेदना फार जास्त नसतात. मात्र असं का होत असावं?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 फेब्रुवारी : रडणं आणि हसणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात. होय, हसण्याचे जसे अरिगया फायदे आहेत. तसेच रडण्यामुळेही अनेकवेळी आपल्याला फायदा होतो. मात्र रडताना किंवा हसताना आपल्या डोळ्यातून पाणी येतं त्याचवेळी आपल्या घशातही गोळा आल्यासारखं वाटतं किंवा वेदना जाणवतात.

या वेदना फार जास्त नसतात, म्हणजे अगदी कमी वेळ या वेदना जाणवतात. मात्र असं का होत असावं? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. हरजिंदगीमध्ये दिलेली माहितीनुसार, आपल्या सर्व स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पसरवण्यासाठी आपल्या शरीराने प्रथम श्वास घेणे आवश्यक आहे. अधिक हवा घेण्याच्या प्रयत्नात मज्जासंस्था ग्लोटीसला असा संदेश पोचवते की, घशातील छिद्र जे अन्न न गिळता फुफ्फुसात हवा आणते ते शक्य तितक्यावेळ उघडेच राहावे.

सामान्य भाषेत बोलायचे झाले तर तुमचा घसा सामान्यपेक्षा जास्त विस्तीर्ण होतो. यामुळे स्‍नायूंचा ताण जाणवतो. सहसा हे अगदी सामान्य आहे. मात्र रडताना ग्लॉटिस रडत उघडे राहण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी गिळताना ते बंद करणे भाग पडते. या ताणामुळे घशातील स्नायूंमध्ये गडबड होते, ज्यामुळे घशात वेदना किंवा गाठ जाणवते.

रडताना घशामध्ये अशी गाठ किंवा गोळा जाणवण्याला ग्लोबस संवेदना म्हणतात. तणावपूर्ण परिस्थितीत असे प्रत्येकासोबत घडते. व्यक्ती शांत झाल्यावर ग्लोटीस पूर्वीप्रमाणे कार्य करण्यास सुरवात करतात. त्यानंतर या वेदना किंवा जाणीव त्वरीत नाहीशी होते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle