• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • रडायला येत नसलं तरी डोळ्यातून सतत का येत पाणी?

रडायला येत नसलं तरी डोळ्यातून सतत का येत पाणी?

वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अश्रू येण्याला एपिफोरा म्हणतात

 • Share this:
  मुंबई, 12 ऑक्टोबर : दु:ख असो किंवा सुख डोळ्यातून अश्रू (Tears) येतातच. पण काही वेळा रडायला न येताही डोळ्यांतून पाणी येतं (Water from eye). अश्रू हे डोळ्यांसाठी (Eye water) काही प्रमाणात लाभदायी असतात कारण डोळे ल्युब्रिकेटेड ठेवण्यासाठी आणि डोळ्यात गेलेले बाहेरील कण काढून टाकण्यासाठी उपयुक्त असतात (Cause of water from eye). पण अनेकदा डोळ्यातून सतत (Eye health) पाणी येत राहतं, असं का (Eye problem)? वैद्यकीय शास्त्रात रडण्याव्यतिरिक्त चेहऱ्यावर अश्रू येण्याला एपिफोरा म्हणतात. हे एका आजाराचं लक्षण आहे. ज्यात डोळ्यात अपुऱ्या टिअर फिल्म ड्रेनेज तयार होतात. या परिस्थितीत अश्रू नॅसोलाक्रिमल सिस्टमच्या माध्यमातून जाण्याऐवजी चेहऱ्यावर ओघळतात. मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवा विभागाच्या प्रमुख डॉ. नीता शाह यांनी सांगितलं, "अश्रूंची प्रमाणापेक्षा अधिक निर्मिती आणि कोंडलेल्या वाहिन्यामुळे डोळ्यातून पाणी येतं. बाळांमध्ये कोंडलेल्या वाहिन्या हे सर्वसाधारण आढळणारे कारण आहे. काही बालकांमध्ये जन्मजात अविकसित वाहिन्या असतात. काही आठवड्यांनी या पूर्ण विकसित झाल्यावर त्या रिकाम्या होतात. अश्रूवाहिनी निमुळती झाली असेल किंवा कोंडली असेल तर संसर्ग होण्याचा धोका असतो. परिणामी अश्रूंच्या पिवशीत अश्रू साचून राहू शकतात. प्रौढांमध्ये आणि मोठ्या मुलांमध्ये अश्रूंची अतिनिर्मिती हे सामान्यपणे आढळणारे कारण असतं" डोळ्यातून पाणी येण्याच्या इतर समस्या अॅलर्जिक कंजंक्टिव्हायटिस - डोळे येणे ही स्थिती एका अॅलर्जीमुळे उद्भवते. जी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या प्रमाणापेक्षा अधिक दिल्या गेलेल्या प्रतिसादामुळे निर्माण होते.  त्यामुळे डोळ्यातून पाणी येणं, डोळ्यात खाज येणं, डोळे लाल होणं आणि पाहताना त्रास होणं हे परिणाम होतात. हे वाचा - मुलतानी मातीचा नेहमी वापर करताय? तुम्हाला त्याचे हे दुष्परिणाम माहिती आहेत का? रुग्णांनी ॲलर्जेन टाळावेत, डोळे चोळू नये आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नयेत. संसर्गजन्य कंजन्क्टिव्हायटिसमध्ये डोळे लाल होणं, वेदना होणं, प्रकाशाकडे बघण्यास त्रास होणं, चिकटपणा जाणवणं, चिकट द्रव बाहेर येणं ही लक्षणं दिसू शकतात. हा संसर्ग कोणत्याही उपचाराविना एका आठवड्यात बरा होऊ शकतो. डोळ्यात शुष्कपणा येणं - डोळ्यात शुष्कपणा येण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. यात शरीराकडून अश्रूंची पुरेशी निर्मिती न होणं, अश्रू पटकन सुकणं, पाणी आणि म्युकस यांचं योग्य संतुलन नसणं, वाहता वारा थेट डोळ्यात जाणं, वाढलेलं वय आणि काही आजार (थायरॉईड आय आजार, गंभीर स्वरूपाचा सायनस, ऱ्ह्युमेटॉइड आर्थरायटिस, जॉग्रेन्स सिण्ड्रोम, एसएलई इत्यादी) यांचा समावेश आहे.  या परिस्थितीमध्ये डोळे अधिक अश्रू निर्माण करून प्रतिसाद देतात. पापण्यांच्या समस्या - डोळ्यात पाणी येण्यासाठी पापण्यांच्या समस्याही कारणीभूत असू शकतात. यात पापण्यांच्या कडेचा भाग वळणं किंवा पापण्यांच्या कडा बाहेरच्या बाजूस वळणं किंवा पापण्या अपुऱ्या बंद होणं इत्यादींचा समावेश आहे. पापण्यांच्या कडांजवळ असलेल्या ग्रंथी कोंडल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास ब्लेफरायटिस होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुग्णांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं, डोळे लाल होऊ शकतात, डोळ्यांमध्ये कंड येऊ शकतं आणि पापण्यांवर कोंडा जमा होऊ शकतो. रांजणवाडी - ब्लेफरायटिसशी संबंधित रांजणवाडी ही लाल रंगाची सुजलेली पुळी असते जी पापण्यांच्या कडेला तयार होते आणि बाहेरील पापण्यांच्या जवळ असते किंवा आत असते किंवा पापण्यांच्या खाली असते (अंतर्गत) आणि तैल ग्रंथींना सूज येते. हे वाचा - रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करते काळी मिरी; या गोष्टींवरही आहे गुणकारी बाहेरचं काही डोळ्यात गेले तर सामान्य असलेल्या स्वच्छ पाण्याने डोळे धुवावे आणि डोळे चोळू नये. हे केल्यानंतरही डोळ्यात गेलेले बाहेरचे काही डोळ्यात असल्याची जाणीव कायम असेल तर रुग्णाने नेत्रविकार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. ल्युब्रिकेशनसाठी कृत्रिम अश्रू, अँटिबायोटिक  ड्रॉप्स वापरून ते कण बाहेर काढावेत. रासायनिक घटकांमुळे इजा झाली असेल तर भरपूर स्वच्छ पाणी घेऊन डोळा धुवावा. धूळ, रेती, कीटक, कॉन्टॅक्ट लेन्स यामुळे कॉर्नियाला (नेत्रपटल) चरा पडू शकतो. अशा परिस्थितीत संसर्ग वाढू नये यासाठी रुग्णाने नेत्रविकारतज्ञाची ताबडतोब भेट घ्यावी.
  Published by:Priya Lad
  First published: