मुंबई, 11 ऑक्टोबर : काळ्या मिरीचा (Black Pepper) सामान्यतः सर्दी-खोकल्यासाठी वापर केला जातो. मात्र, त्याचे असे अनेक फायदे आहेत, ज्यांची लोकांना फार कमी माहिती आहे. काळ्या मिरीचा सर्वात जास्त वापर मसाला म्हणून केला जातो. अनेक शतकांपासून सर्दी-खोकल्यासाठी हे औषध म्हणून वापरलं जात आहे. परंतु, हेल्थलाईनच्या बातमीनुसार, त्यात असलेल्या उच्च अँटिऑक्सिडेंट्समुळे (High antioxidants), रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासदेखील ती उपयुक्त आहे. ही बाब विज्ञानानंही सिद्ध केली आहे. काळी मिरी मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली (Health Benefits of Black Pepper) मानली जाते. त्यात दाह-विरोधी गुणधर्मही आहेत, जे कर्करोगाशी लढण्यासाठीदेखील उपयुक्त आहेत.
काळ्या मिरीचे आणखी फायदे
काळ्या मिरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. याच्यामुळे शरीरातून फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत होते. या फ्री रॅडिकल्समुळे जळजळ, अकाली वृद्धत्व, हृदयरोग, कर्करोग आदी आजार होतात.
जळजळ होण्याच्या समस्येमुळे संधिवात, मधुमेह, कर्करोग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. काळ्या मिरीमध्ये पिपेरिन कंपाऊंड (piperine) आढळतं. याचा सूज येण्यावर प्रभावी उपयोग होतो. ही शरीराच्या पेशींमध्ये सूज तयार होण्यास प्रतिबंध करते.
हे वाचा - आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी यांचे आहेत कौटुंबिक संबंध! पाहा काय आहे दोघांचं नातं
एका अभ्यासात असं आढळून आलंय की, मेंदूचं काम सुरळीत करण्यासाठी पिपेरिन देखील उपयुक्त आहे. अभ्यासानुसार, काळी मिरी अल्झायमर आणि पार्किन्सन रोगापासून संरक्षण करण्यास मदत करते.
उंदरांवर केलेल्या अभ्यासात हे सिद्ध झालंय की, काळी मिरी रक्तातील साखरेचे चयापचय सुधारते. हे इन्सुलिनवरदेखील नियंत्रण ठेवते. एका अभ्यासानुसार, काळ्या मिरीमध्ये आढळणारी संयुगं कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्यानं कमी करतात.
काळ्या मिरीचा नियमित वापर केल्यानं भूक कमी होते, त्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी देखील ती फायदेशीर आहे.
सर्दी-पडशाचा खूप त्रास होत असेल तर, रात्री झोपताना गरम दुधात काळी मिरी मिसळून प्या. सकाळी तुम्हाला फरक जाणवू लागेल.
तुम्हाला कफची तक्रार असेल आणि त्यातून सुटका होत नसेल तर एक चमचा मधात 3 बारीक काळी मिरी पावडर, एक चिमूटभर हळद मिसळून त्याचं सेवन करा. असं केल्यानं कफच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips