व्हॅलेंटाइन डे (Valentine's Day 2021) आता जवळ आला आहे. तुमची प्रेमाची कुंडली काय सांगते? राशीवरून तुमचं कुठल्या प्रकारच्या जोडीदाराशी पटेल? टॅरो कार्ड रीडर आणि थेरोपेटिक हीलर पूजा ए भंडारी यांनी सांगितलेली राशीवैशिष्ट्य.
मकर : मकर राशीचे लोक व्यावहारिक असतात. त्यांच्याकडे सगळी संसाधनं असतात. पण ते कडक शिस्तीचे आणि प्रॅक्टिकलही असतात. तुम्ही प्रत्येक लहान -मोठ्या गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून राहू शकता. ते चांगले सल्लागार असतात. ते आपल्या लोकांसोबत काही वाईट किंवा चुकीचं होताना पाहू शकत नाहीत. हे लोक मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. मकर राशीवाले वेळेचे खूपच पक्के असतात. त्यांना कधीही वाट पाहायला लावू नये. हे लोक लहान लहान गोष्टींचाही खूप चांगल्या प्रकारे विचार करतात. हे लोक चांगल्या विनोदबुद्धीचे आणि मस्तीखोरसुद्धा असतात. यांच्यासोबत तुम्ही लॉंग ड्राइव्ह किंवा संगीताचाही आनंद घेऊ शकता.
(मकर राशीसाठी परफेक्ट जोडीदार वृषभ आणि कन्या राशीचा असतो.)
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांचा खाणंपिण, फॅशन किंवा इतर कोणत्याही गोष्टीत स्वतःचा असा एक हटके अंदाज असतो. हे लोक खूपच उत्साही आणि प्रेमात वाहून जाणारे असतात. त्यांना आपल्या जोडीदारात संगीताची, कलेची समज असलेली हवी असते. तसंच जोडीदार बुद्धिमान असावा/असावी असंही वाटत असतं. या राशीच्या लोकांना नाटकीपणा किंवा दिखावा पसंत नसतो. तुमच्यातला साधेपणाच त्यांना भावतो. हे लोक तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि तुमच्या गुणांवर लक्ष केंद्रित करतात.
(कुंभसाठी परफेक्ट जोडीदार मिथुन,तूळ आणि धनु राशीचा असतो.)
मीन : मीन राशीचे लोक खूपच साधे असतात. मात्र तुम्ही त्यांच्यापासून काही लपवू शकत नाही. तुमच्या मनात आणि डोक्यात काय चाललंय हे लोक पटकन ओळखतात. ते खूपच दयाळू आणि प्रेमळसुद्धा असतात. मीन राशीवाले आपल्या प्रियजनांना प्रत्येक गोष्टीत समर्थन करतात. दुसऱ्यांच्या आनंदात ते आपला आनंद शोधतात .
(मीन राशीसाठी परफेक्ट जोडीदार वृषभ ,कर्क आणि मकर राशीचा असतो .)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Love, Relationship, Romance, Valentine's day