मुंबई, 24 मार्च : लपाछपीचा खेळ बालपणातला सगळ्यांचा आवडता खेळ असतो. ऑप्टिकल इल्युजन हे त्याचं ऑनलाइन रूप आहे. यात चित्रात किंवा फोटोत लपलेली एखादी गोष्ट तुम्हाला शोधायची असते. हा खेळ नुसता रंजकच नसतो, तर त्यातून बुद्धिमत्तेची चाचणीही घेता येते. सध्या व्हायरल होणाऱ्या कोड्यात एका मैदानावर पडलेला टेनिस बॉल शोधायचा आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी केवळ 4 सेकंदांचा वेळ आहे. खरं तर तो बॉल अगदी समोरच आहे; मात्र कोणालाही पटकन सापडणार नाही असा आहे.
ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांसाठी काही चित्रं खास तयार केली जातात, तर काही फोटो काढल्यानंतर त्यातून ऑप्टिकल इल्युजनचं कोडं तयार होतं. हा फोटोही असाच काहीसा आहे. यात हिरव्या रंगाचं गवत असलेलं एक मैदान आहे. या मैदानावर टेनिसचा एक बॉल हरवला आहे. मैदान एकदम स्वच्छ आहे. त्यावर इतर कोणतीही वस्तू नाही; पण टेनिस बॉल म्हणजे अतिशय छोटीशी गोष्ट आहे. त्यातच मैदानावर खालच्या बाजूला पडलेल्या एका पांढऱ्या गोष्टीमुळे युझर्स गोंधळात पडू शकतात; मात्र ती पांढरी वस्तू म्हणजे टेनिस बॉल नाही.
Finger Snapping : तुम्हाला माहितीये बोटांची चुटकी का आणि कशी वाजते? बोटांवर कसा होतो परिणाम
मैदानावर तो बॉल कुठेही लपवलेला नाही. तो अगदी समोर आहे; मात्र तो पांढऱ्या रंगाचा नसून हिरव्याच रंगाचा असल्याने सहजासहजी कोणाला सापडणार नाही. अशी कोडी सोडवणाऱ्यांना याचं उत्तर मिळालं असेलही; पण ज्यांना उत्तर सापडलं नाही, त्यांच्यासाठी एक हिंट म्हणजे हा बॉल गवतावर आहे. आता हिरव्या रंगाचा गवतावरचा बॉल शोधणं कदाचित सोपं होईल; मात्र तरीही सापडला नाही, तर सोबतचा फोटो पाहिल्यावर कोड्याचं उत्तर मिळेल.
ऑप्टिकल इल्युजनची कोडी सोडवणं हे खूप मनोरंजक असतं. यामुळं मनाला तजेला मिळतो. बुद्धीला चालना देण्यासाठीही या खेळाची मदत होते. त्यामुळेच मेंदूचा व्यायाम म्हणून त्याकडे पाहिलं जातं.
ऑप्टिकल इल्युजनद्वारे बुद्धिमत्ता चाचणी घेता येते, तसंच व्यक्तिमत्त्वही तपासता येतं. एखाद्या फोटोकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व उलगडता येतं. मानसोपचार थेरपीजमध्ये याचा वापर केला जातो. ऑप्टिकल इल्युजनद्वारे बुद्धिमत्ता तपासायची असेल, तर ते शक्य असतं; मात्र बुद्धिमत्ता चाचणीसाठी केवळ याच माध्यमावर अवलंबून राहता येत नाही. बुद्धीला चालना देणारा हा खेळ मनोरंजकही असल्यानं सोशल मीडियावर तो खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच या कोड्यांना भरपूर व्ह्यूज आणि लाइक्स मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.