मुंबई, 31 डिसेंबर : आपले शरीर फिट, निरोगी आणि आकर्षक असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी अनेक जण खूप मेहनत देखील घेतात. अनेक जण व्यायम आणि योगा करून शरीर फीट ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर काही लोक आहारात आवश्यक बदल करून शरीराची काळजी घेतात. अनेक जण वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात रोजच्या आहारातून कॅलरीज कमी करतात. कारण कॅलरीजमुळे पोट आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते.
झिरो फिगरच्या प्रयत्नात अनेक महिला आहारात कॅलरीजचे प्रमाण कमी करतात आणि ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आपल्याला रोजच्या आहारात किती कॅलरीजची आवश्यकता असते आणि शरीरात कॅलरीजची कमतरता भासल्यास काय नुकसान होते हे जाणून घेऊया.
Weight Loss Tips : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा हे पीठ; आरोग्यसाठीही फायदेशीर
एका दिवसात कॅलरीजची आवश्यकता?
तुम्ही किती शारीरिक काम करता यावर तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण अवलंबून असते. म्हणजेच शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तीला ऑफिसमध्ये एका जागी बसून काम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त कॅलरीजची आवश्यकता असते.
कॅलरीजच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान
अशक्तपणा जाणवतो : तुमच्या शरीरात कॅलरीजची कमतरता निर्माण होते तेव्हा तुमचे शरीर कमकुवत होते. कॅलरी आपल्या शरीरात इंधन म्हणून काम करतात. म्हणजेच कमी कॅलरीजमुळे तुमची ऊर्जाही कमी होते आणि थकवा जाणवू लागतो. यासाठी आहारतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि गरजेनुसार कॅलरीयुक्त पदार्थ खावे असा सल्ला देण्यात येतो.
केस आणि नखांवर परिणाम : शरीरातील कॅलरीजची कमतरता तुमच्या केस आणि नखांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुमच्या एकूण सौंदर्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या केसांची गळती होऊ शकते आणि त्यामुळे टक्कल पडण्याचा धोकाही निर्माण होतो. याशिवाय नखे कमकुवत होऊ शकतात आणि तुटू लागतात.
त्वचा कोरडी होते : कॅलरीज आपल्या त्वचेसाठीही महत्त्वाच्या असतात. याबाबात फार कमी लोकांना माहिती आहे. शरीरात कॅलरीजची कमतरता असेल तर त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. त्यामुळे फिटनेसच्या नादात शरीरात कॅलरीची कमतरता होणार नाही याकडे आवश्य लक्ष द्या.
शरीर सुडौल-फिट राखण्यासाठी रोजच्या आहारात फक्त इतका करा बदल
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Weight loss tips