मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

क्या बात (स्वाद) है जिंदगी मे! कॅडबरीची ती 'कुछ खास है' जाहिरात आठवत असेल तर हा VIDEO पाहाच

क्या बात (स्वाद) है जिंदगी मे! कॅडबरीची ती 'कुछ खास है' जाहिरात आठवत असेल तर हा VIDEO पाहाच

90 च्या दशकातली कॅडबरीची जाहिरात अजूनही स्मरणात असेल ना? कंपनीने Nostalgia जागवणारा हा Remake केला आहे. तो भन्नाट आहे कारण नव्या जमान्याला साजेसा यात एक ट्विस्ट आहे. पाहा VIDEO

मुंबई, 17 सप्टेंबर: 'कुछ खास हैं हम सभी मे..  क्या स्वाद है जिंगदी मे'... मित्राने शेवटच्या बॉलला मारलेली सिक्सर पाहून ती इतकी एक्साइट होते की, चक्क क्रिकेटच्या मैदानावर सिक्युरिटीला बगल देत पळत येते, मनमुक्तपणे उस्फूर्त नाचत त्याला मिठी मारते... 90 च्या दशकातली कॅडबरीची जाहिरात अजूनही स्मरणात असेल ना? नव्या पिढीने ती पाहिलेली नसेल. पण Remake च्या जमान्यात त्यांच्यासाठी या कंपनीने या जाहिरातीचा एक ताजा रीमेक केला आहे. Nostalgia जागवणारा हा रीमेक भन्नाट आहे कारण नव्या जमान्याला साजेसा यात एक ट्विस्ट आहे.

Good Luck Girls असं म्हणत कॅडबरीज डेअरी मिल्कने सध्याच्या जमान्याची नस बरोब्बर पकडली आहे. 90 च्या जमान्यात ती उत्फुल्ल ललना अनेकांना भुरळ घालत होती आता तिची जागा घेतली आहे क्यूट सरदारजीने. आपल्या मैत्रिणीला चीअर करताना त्याने अगदी डिट्टो तसाच डान्सही केला आहे.

90 च्या दशकात मुलगी प्रेक्षकात बसलेली आहे आणि मैदान गाजवणारा आहे मुलगा - तिचा मित्र. आत्ताच्या जमान्यात मात्र चित्र उलटं झालं आहे. मुलगी मैदान गाजवत आहे आणि तिला चीअर करायला तिचा मित्र प्रेक्षकांत बसलेला दाखवला आहे.

OMG! मृतदेहांचा मेकअप करते ही तरुणी; डेडबॉडीसाठीही ब्रँडेड प्रोडक्ट्स

मुलींच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी, त्यांच्या यशोगाथा साजऱ्या करण्यासाठी आणि रोल मॉडेल म्हणून आजच्या तरुणाईपुढे मुलींचे आदर्श ठेवण्यासाठी #GoodluckGirls असा हॅशटॅग ठेवत कंपनीने आपलीच जुनी जाहिरात नव्याने नव्या प्रेक्षकांपुढे ठेवली आहे.

जुनी जाहिरात बघायची असेल तर इथे खाली क्लिक करा

" isDesktop="true" id="605930" >

ही जाहिरात सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. Best of Nostalgia, Next level Nostalgia, असं म्हणत लोकांनी ही संकल्पना डोक्यावर घेतलेली दिसते.

Gender Equality ची संकल्पना खूप सहजपणे आणि थेट भिडेल अशी लोकांपर्यंत पोहोचवली आहे आणि लोकांना जाहिरात आवडलेली आहे. फक्त काही तासांत या जाहिरातीला लोकांनी लाइक करून व्हायरल केलं आहे.

First published:

Tags: Advertisement