मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना लसीकरणात या देशाला मोठं यश; दिली सर्वात पहिली GOOD NEWS

कोरोना लसीकरणात या देशाला मोठं यश; दिली सर्वात पहिली GOOD NEWS

एकिकडे कोरोना लशीवरून (Corona vaccine) गोंधळ उडाला आहे त्याचवेळी दुसरीकडे लसीकरणाबाबत ही महत्त्वाची माहिती समोर येते आहे.

एकिकडे कोरोना लशीवरून (Corona vaccine) गोंधळ उडाला आहे त्याचवेळी दुसरीकडे लसीकरणाबाबत ही महत्त्वाची माहिती समोर येते आहे.

एकिकडे कोरोना लशीवरून (Corona vaccine) गोंधळ उडाला आहे त्याचवेळी दुसरीकडे लसीकरणाबाबत ही महत्त्वाची माहिती समोर येते आहे.

जिब्राल्टर, 19  मार्च : कोरोना महासाथीला (Coronavirus) रोखण्यासाठी एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. अशामध्ये जिब्राल्टर (Gibralter) जगातला पहिला देश ठरला आहे. ज्याने देशातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस (Corona Vaccine) दिली आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी सांगितलं की, 'या ब्रिटिश ओव्हरसीज टेरिटरी असलेल्या जिब्राल्टरने बुधवारी हे यश मिळवलं आहे. जिब्राल्टरची लोकसंख्या फक्त 33,000 एवढी आहे. याठिकाणी 4,263 जणांना कोरोनाची लागण झाली होती तर 94 रुग्णांचा मृत्यू झाला होता.'

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मॅन हॅनकॉक यांनी सांगितलं की, हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की देशातील संपूर्ण ज्येष्ठ लोकसंख्येसह बुधवारी कोरोना लसीकरण कार्यक्रम (corona vaccine programme) पूर्ण करणारा जिब्राल्टर जगातील पहिला देश ठरला आहे.' त्यांनी पुढं सांगितलं की, 'या संकटाच्या काळात सर्व जिब्राल्टरवासीयांनी दाखवलेल्या संयम आणि धैर्याचे मी कौतुक करतो.'

हे वाचा - कुणी आवरायचं! उच्चांकी रुग्णसंख्येनंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत बाजारात ही स्थिती

आरोग्यमंत्र्यांनी (Health Minister) पुढं सांगितलं की, 'मी याच्याशी समहत आहे की लसीकरण कार्यक्रम ब्रिटिश फॅमिली ऑफ नेशन्सच्या टीम भावनेमुळे यशस्वी झाला आहे.' मुख्यमंत्री फॅबियन पिकार्डो यांनी लसीकरण मोहीमेसाठी युनायटेड किंग्डम सरकारचे आभार मानले. जेव्हा स्पेन आणि युरोपियन देशांमध्ये लसीवरून गोंधळ उडाला आहे त्याचवेळी जिब्राल्टरने लसीकरण पूर्णही केलं.

दरम्यान, युरोपियन युनियनची औषध प्रशासन एजन्सी युरोपियन मेडिसीन एजन्सीने (ईएमए) अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. त्यानंतर इटली, फ्रान्ससह अनेक देशांनी त्याचा वापर करण्यास सुरुवात केली.

या एजन्सीनं सांगितलं की, त्यांच्या सुरुवातीच्या तपासामध्ये लसीच्या प्रभावामुळे रक्त गोठण्याची चिन्ह दिसून आली. त्यानंतर असं म्हटलं जात आहे की, युरोपमधील 18 देश या लसीवर लावलेले सर्व निर्बंध लवकरच संपवू शकतात. आधी असा दावा करण्यात आला होता की, ही लस घेणाऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या होत आहेत.

हे वाचा - कोरोना लशीमुळे आजारी पडलात तर विमा कंपनी उचलणार खर्च? सरकारने घेतला मोठा निर्णय

लसीकरण ही तशी मोठी प्रक्रिया असते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात तर ते शिवधनुष्य पेलण्याएवढं मोठं आव्हान आहे. तरीही भारतात नियोजनपूर्वक पहिल्यांदा वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती यांनाच लस दिली गेली. त्यानंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांनाही लस देणं सुरू झालं. सध्या महाराष्ट्रातही अनेक ज्येष्ठ नागरिक सरकारी तसंच खासगी रुग्णालयांत जाऊन लस टोचून घेत आहेत.

First published:

Tags: Britain, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Health, International, Success, Wellness