• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • काहीही! लेकीच्या ब्रेस्टवर थुंकून आशीर्वाद देतात वडील; हैराण करणारी लग्नातील विचित्र प्रथा

काहीही! लेकीच्या ब्रेस्टवर थुंकून आशीर्वाद देतात वडील; हैराण करणारी लग्नातील विचित्र प्रथा

ही प्रथा वाचून तर तुम्हाला धक्काच बसला असेल नाही का?

  • Share this:
    नैरोबी, 05 ऑगस्ट : प्रत्येक समाज, धर्म, देशानुसार लग्नाच्या (Wedding) विधी आणि परंपराही (Wedding traditions) वेगवेगळ्या असतात. ज्या कित्येक वर्षांपासून चालत आल्या आहेत. त्यापैकी काही विधी-परंपरा आपल्याला माहिती आहेत तर काही नाही. यात काही विधी-परंपरा इतक्या विचित्र (Bizarre wedding traditions) आहेत, की त्या पाहून किंवा ऐकून आपण हैराण होतो. आता ही प्रथा वाचून तर तुम्हाला धक्काच बसला असेल नाही का? लग्नात नवरा-नवरीला अनेकांचे आशीर्वाद मिळतात. सामान्यपणे आपण मोठ्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवतो किंवा तोच हात आपल्या छातीला लावतो. त्यानंतर मोठी माणसं आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देतात. पण एक देश असा आहे, जिथं नवरी मुलीवर थुंकून तिचे वडील तिला आशीर्वाद देतात (Bride father spits on daughters breasts and head). हे वाचा - काहीही! नवऱ्याला मंडपातच नवरीला द्यावी लागते इनरविअर; लग्नाची विचित्र परंपरा ही प्रथा आपल्यासाठी नक्कीच विचित्र आहे.  कारण एखाद्यावर थुंकणं ही सवय म्हणजे आपल्याकडे वाईट मानली जाते. पण आपली ही वाईट सवयच इथंच लग्नात केली जाते. आता ही प्रथा नेमकी कुठे केली जाते, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल नाही का? रिपोर्टनुसार लग्नात नवरीवर थुंकण्याची प्रथा आहे, पूर्व आफ्रिकेतील केन्या देशात.  लग्नात वधूचे वडील आपल्या मुलीच्या डोक्यावर आणि ब्रेस्टवर थुंकतात. असं करून ते आपल्या मुलीला आशीर्वाद देतात. आणखी काही विचित्र परंपरा. चीनच्या तुजिया समाजात लग्नाच्या एक महिनाआधी होणारी नवरी आणि तिच्या घरातील महिला दररोज एक तास रडतात. याला शुभ मानलं जातं. ग्रीकमध्ये पाहुणे आणि कुटुंबाचे सदस्य मिळून जेवणाच्या प्लेट तोडतात. नवरा-नवरीसाठी हे शुभ मानलं जातं. हे वाचा - Shocking! रात्री अज्ञातासोबत तरुणीने केलं असं काही, काही क्षणातच पुतळा बनली स्कॉटलंडमध्ये फाटलेलं दूध, मृत मासे, खराब झालेलं अन्न अशी प्रत्येक खराब वस्तू नवरीवर फेकली जाते. आयुष्यात सर्वकाही सांभाळण्याची क्षमता मिळते, असा समज यामागे आहे. बुल्गारियातील एका शहरात नवरीच्या चेहऱ्या पांढरा रंग लावला जातो. त्यानंतर सासरचे लोक तिच्या चेहऱ्यावर पेंटिंग करतात.
    Published by:Priya Lad
    First published: