Home /News /lifestyle /

महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेला समजू नका सामान्य; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण

महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेला समजू नका सामान्य; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण

अनेक महिलांना ब्रेस्ट (Breast), निपल्स (Nipples) यांना खाज येते. मात्र सर्वसामान्य खाज (Itching) म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात.

    अनेक महिलांना ब्रेस्ट (Breast), निपल्स (Nipples) यांना खाज येते. त्वचा आणि ब्रेस्टची वाढ हे ब्रेस्टला खाज येण्याची 2 सर्वसामान्य अशी कारणं आहेत. मात्र जर तुमच्या ब्रेस्टला आठवडाभरापेक्षा खाज येत असेल, खाजेची तीव्रता अधिक असेल, निपलला खाज येण्यासह त्याच्या आजूबाजूच्या भागात बदल झाला असेल, खाजेसह वेदना-सूज असेल तर मात्र चिंतेचं कारण आहे. डॉक्टरांना जरूर दाखवा. ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्टला खाज येणं हे ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या मते, इन्फ्लमेटरी ब्रेस्ट कॅन्सर (inflammatory breast cancer) या दुर्मिळ ब्रेस्ट कॅन्सरचं हे लक्षण आहे. या कॅन्सरमध्ये ब्रेस्टला खाज येण्यासह ब्रेस्टला सूजदेखील येते, शिवाय ब्रेस्ट उबदार वाटतात. जर निपल्स आणि त्याच्या आजूबाजूला खाज येत असेल, तर हेदेखील Pagets’s disease या दुर्मिळ ब्रेस्ट कॅन्सरचं लक्षण असू शकतं. कॅन्सर नसलेला ट्युमर अनेकदा ब्रेस्टमध्ये सौम्य असा ट्युमर असतो, जो कॅन्सरचा नसतो. यामुळेदेखील निपल्सला खाज येते. एक्झेमा तुम्हाला एक्झेमा असेल, तर निपल्स आणि त्याच्याभोवताली पुरळ येतात.  डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार करा. अॅलर्जी अॅलर्जी हे खाजेचं सर्वसामान्य असं कारण आहे. तुम्ही अंघोळीसाठी वापरत असलेला साबण, कपड्यांसाठी वापरत असलेला डिटर्जंट, सौंदर्यप्रसाधनं किंवा कपडे यामुळे तुम्हाला अॅलर्जी झाली असण्याची शक्यता आहे. हेदेखील वाचा -  महिलांनो मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवा, उशिरा Period असू शकते गंभीर समस्या रजोनिवृत्ती रजोनिवृत्ती येण्याच्या काळात त्वचा पातळ आणि कोरडी होते. हार्मोन्समध्ये बदल होत असतात. तुमचं शरीर मॉईश्चर गमावत असतं आणि त्यामुळे व्हजायना, निपल्स अशा शरीराच्या कोणत्याही भागावर खाज येते. स्तनांची वाढ तारुण्यात पदार्पण, प्रेग्नन्सी, मासिक पाळी यावेळी हार्मोन्समध्ये बदल होतात. यावेळी स्तनांची वाढ होते, त्यावेळी स्तनांना खाज येते. वजन वाढल्यासही ही समस्या उद्भवते. कोरडं हवामान हवामान थंड आणि कोरडं असेल तर त्यामुळे शरीराला खाज येते. अगदी ब्रेस्ट आणि निपल्सदेखील. अशावेळी अंघोळ किंवा शॉवर 10 मिनिटांत आटोपावं. कोमट पाणी वापरावं कारण गरम पाण्यामुळे त्वचा अधिक कोरडी होते. हिट रॅश उन्हाळ्यात किंवा जास्त तापमानात राहिल्यास हिट रॅशची समस्या उद्भवते. यावेळी ब्रेस्टवर छोटे छोटे पुरळ येतात आणि त्यांना खाज येते. हेदेखील वाचा - महिलांनो UTI च्या समस्येला दूर ठेवायचं आहे, मग 'हा' आहार घ्या
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Woman

    पुढील बातम्या