Home /News /lifestyle /

Washing Machine वापरताय सावधान! कपडे धुता धुता महिलेसोबत भयंकर दु्र्घटना; जागीच मृत्यू

Washing Machine वापरताय सावधान! कपडे धुता धुता महिलेसोबत भयंकर दु्र्घटना; जागीच मृत्यू

फोटो सौजन्य - Canva

फोटो सौजन्य - Canva

वॉशिंग मशीनमुळे महिलेचा झाला मृत्यू.

    ब्राझिलिया, 22 जानेवारी : सध्या इलेक्ट्रिक मशीनमुळे घरातील बरीच कामं सोपी झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे वॉशिंग मशीन (Washing machine). बहुतेक लोक आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतात. तुमच्या घरातही वॉशिंग मशीन असेल. तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. वॉशिंग मशीनमुळे एका महिलेचा जीव गेला आहे (Woman death due to Washing machine). कपडे धुताना या महिलेचा मृत्यू झाला आहे (Woman death while Washing colthes). ब्राझीलमधील ही धक्कादायक घटना आहे. 27 वर्षांची टॅस ़डी ओलिवेरा रोस्ट (Tais de Oliveira Rost). एका 4 वर्षाच्या मुलीची आई आहे. घरातली सर्वच काम ती करायची. नेहमीप्रमाणे ती कपडे धुवायला गेली. वॉशिंगमध्ये तिने कपडे टाकलं. पण यावेळी अचानक आपल्याला मृत्यू गाठेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नसेल. तिचा बॉयफ्रेंड विलिअम बोटेगा (William Bottega) त्यावेळी बाहेर गेला होता. घरी तो परतला तेव्हा गर्लफ्रेंड ओलिबेरा जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडल्याचं त्याला दिसलं. त्याने तिला आवाज देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीरात कोणतीच हालचाल होत नव्हती. त्याने लगेच आपात्कालीन क्रमांकावर फोन केला. पण काहीच उपयोग झाला नाही. कारण तिचा मृत्यू झाला होता. हे वाचा - तुमची मुलंही एकटी बाथरूममध्ये जातात? चिमुकल्यासोबत घडलेली घटना वाचून उडेल थरकाप तपास केल्यानंतर ऑलिवेराच्या मृत्यूचं कारण वॉशिंग मशीन ठरल्याचं आढळून आलं. ती लाऊन्ड्री एरिआमध्ये पडलेली सापडली आणि त्यावेळी ती कपडे धुण्याचं कम करत होती. त्यामुळे वॉशिंग मशीनचा करंट लागल्याने तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मशीनच्या तारेचा झटका तिला लागला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान याचा पुढील तपास सुरू आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Brazil, Death, World news

    पुढील बातम्या