मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /ये प्यार हमे किस मोड पे ले आया! Valentine's Day ला गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्यासाठी प्रियकराने 14 ठिकाणी मारला डल्ला

ये प्यार हमे किस मोड पे ले आया! Valentine's Day ला गर्लफ्रेंडला महागडं गिफ्ट देण्यासाठी प्रियकराने 14 ठिकाणी मारला डल्ला

'व्हेलेंटाइन डे'ला (Valentine's Day) आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट (expensive gift) देण्यासाठी प्रियकर चक्क सराईत गुन्हेगार बनला (commits robbery) आहे. त्याने 3 जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

'व्हेलेंटाइन डे'ला (Valentine's Day) आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट (expensive gift) देण्यासाठी प्रियकर चक्क सराईत गुन्हेगार बनला (commits robbery) आहे. त्याने 3 जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

'व्हेलेंटाइन डे'ला (Valentine's Day) आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट (expensive gift) देण्यासाठी प्रियकर चक्क सराईत गुन्हेगार बनला (commits robbery) आहे. त्याने 3 जिल्ह्यात एकूण 14 ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत.

जींद, 05 जानेवारी: 'व्हेलेंटाइन डे'च्या (Valentine's Day) मुहर्तावर प्रेमाचा फज्जा उडवणारी एक घटना समोर आली आहे. 'व्हेलेंटाइन डे'ला आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट (expensive gift) देण्यासाठी प्रियकर चक्क सराईत गुन्हेगार बनला (commits robbery) आहे. आपल्या प्रियसीला महागडं गिफ्ट देता यावं, यासाठी आरोपी प्रियकराने तिन जिल्ह्यातील 14 ठिकाणी जबरी चोऱ्या केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन रिव्हाल्वरसहित अनेक काडतुसे जप्त केली आहेत.

सदर प्रियकर आरोपीचं नाव बंटी असून त्यांने जींद जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यात एकूण 14 जबरी चोऱ्या केल्या आहेत. हा आरोपी हरियाणातील जींद जिल्ह्यातील रामकालोनी येथील रहिवाशी आहे. त्याच्या अनेक ठिकाणी चोरी केल्यामुळे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. या चोरीचं कारण विचारलं असता आरोपीनं अजब खुलासा केला आहे. गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट देता यावं, यासाठी तो चोऱ्या करत असल्याचा खुलासा केला आहे. आरोपीचं कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

सीआयए इंजार्ज मनोज वर्मा यांनी सांगितलं की, 'बुधवारी सायंकाळी उशीरा एएसआय सुरेंद्र सिंह यांची टीम सफिदों रोड नाका या परिसात पेट्रोलिंग करत होती. त्यावेळी त्यांना गुप्त सुचना मिळाली की, 'एकलव्य स्टेडियमच्या जवळ एक युवक अवैध हत्यार घेवून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून युवकाला ताब्यात घेतलं. यावेळे त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगमधून दोन पिस्टल आणि दोन रिव्हॉल्वरसहित जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी केल्यानंतर त्याने हा अजब गजब खुलासा केला आहे. त्याने चौकशीत खुलासा केला की, व्हेलेंटाइन डे आपल्या गर्लफ्रेन्डला महागडं गिफ्ट देता यावं, यासाठी तो चोऱ्या करत होता. त्याने पुढे सांगितलं की, या चोऱ्या करण्यासाठी त्यांचं एक टोळकं असून त्याचा म्होरक्या अमरदीप उर्फ दीपा आहे. चोरी करण्याची योजना बनवण्याचं काम या म्होरक्या अमरदीपकडे असायचं, त्यानंतर बंद घरावर किंवा दुकानात डल्ला मारला जायचा, अशी माहितीही आरोपी बंटीने दिली आहे. पोलीस चौकशीत आरोपी बंटीने त्याच्या विरोधात 11 खटले दाखल असून 14 ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

First published:

Tags: Crime news, Robbery Case, Valentine day