संशोधनातूनही झाला होता खुलासा; त्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता Amitabh Dayal लासुद्धा आला Heart attack
बॉलिवूड अभिनेता अमिताभ दयालचा (Amitabh Dayal) हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅक कधी येतो, याबाबत संशोधनही झालं होतं.
|
1/ 10
बॉलिवूड अभिनेता अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 51 वर्षीय अमिताभ दयाल यांनी आज पहाटे 4.30 वाजता मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
2/ 10
याआधीही काही सेलिब्रिटींचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे हार्ट अटॅकबाबत संशोधकांनी अभ्यास केला होता. त्यातून धक्कादायक खुलासा झाला होता.
3/ 10
स्वीडनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार एखाद्या ठराविक वर्षातल्या एखाद्या ठराविक दिवशी हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच वर्षातला एखादा महिना आठवडा किंवा एखादा दिवस असा असतो ज्या दिवशी हार्ट अटॅक येण्याची भीती वाढलेली असते .
4/ 10
स्वीडनमध्ये या संदर्भात हृदय रोग असणाऱ्या 1.5 लाख लोकांवर संशोधन करण्यात आलं. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आली.
5/ 10
या रिसर्चनुसार शक्यतो सोमवारी हार्ट अटॅक येण्याची भीती जास्त असते. तर शनिवारी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण कमी असतं. सोमवारी इतर दिवसांच्या तुलनेत 11 टक्के जास्त जणांना हार्ट अटॅक आलेत.
6/ 10
शनिवारी आणि रविवारी काम नसतं त्यामुळे स्ट्रेस कमी असतो. आठवड्यातल्या पहिल्या दिवशी ऑफिसच्या स्ट्रेसमुळे बायलॉजिकल सिस्टीमवर परिणाम होतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
7/ 10
जेव्हा हार्ट पेशंटमध्ये स्ट्रेस लेव्हल वाढते तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये स्पाईक नावाची एक प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे बोनमॅरोवर परिणाम होतो. त्यावेळी इम्युन सेल्सला बाहेर येण्याची सूचना दिली जाते. मात्र जास्त प्रमाणात इम्युन सेल्स बाहेर येण्यामुळे नसा आणि हृदयावर सूज घेते.
8/ 10
ज्या लोकांना हार्ट अटॅक आला आहे. त्यांच्या मनावर जास्त ताण असल्याचही लक्षात आलंय. एखादा मानसिक त्रास, डिप्रेशन,स्ट्रेस अशा समस्या असतील तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
9/ 10
मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ दयालला 17 जानेवारी रोजी हार्ट अटॅक आला होता. गेल्या 13 दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते.
10/ 10
महत्त्वाचं म्हणजे अमिताभ दयायला ज्या दिवशी हार्ट अटॅक आला तो दिवस सोमवारच होता, ज्याबाबत संशोधकांनी खुलासा केला होता.