मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला; पालकांनो अलर्ट राहा

खळबळजनक! कोरोनापाठोपाठ Mucormycosis सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचला; पालकांनो अलर्ट राहा

कोरोनामुक्त मुलाला म्युकोरमायकोसिसही (Mucormycosis in children) झाल्याचं पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.

कोरोनामुक्त मुलाला म्युकोरमायकोसिसही (Mucormycosis in children) झाल्याचं पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.

कोरोनामुक्त मुलाला म्युकोरमायकोसिसही (Mucormycosis in children) झाल्याचं पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.

  • Published by:  Priya Lad

अहमदाबाद, 21 मे : कोरोनाच्या पहिल्या लाटेचा लहान मुलांना (Coronavirus in children) मोठा फटका बसला नाही. पण दुसऱ्या लाटेची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचली. यामुळे आधीच पालकांनी धसका घेतलेला असताना आता कोरोनासह आलेल्या म्युकोरमायकोसिसचा (Mucormycosis in children) धोका फक्त प्रौढांनाच नाही तर लहान मुलांना आहे. लहान मुलाला ब्लॅक फंगल इन्फेक्शन (Black fungus in children) झाल्याचं पहिलंच प्रकरण समोर आलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांना म्युकोरमायकोसिस होत असल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. पण आतापर्यंत यामध्ये प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. आता तर एका लहान मुलालाही याचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये 13 वर्षांच्या मुलाला म्युकोरमायकोसिसची (Gujrat 13 year old boy infected with Mucormycosis) लागण झाली आहे.

हे वाचा - कोरोनामुक्त कुटुंबातील चिमुरड्यांचं आरोग्य धोक्यात! जखडतोय विचित्र आजार

या मुलाला याआधी कोरोना झाला होता. कोरोनातून तो बराही झाला होता. पण आता त्याला काळ्या बुरशीने आपल्या विळख्यात घेतलं आहे.  मुलाला आणि त्याच्या आईला कोरोना झाला होता. त्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण मुलाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. कोरोनाविरोधातील लढा जिंकल्यानंतर दीड महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये म्युकोरमायकोसिसची लक्षणं दिसून आली. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

हे वाचा - काळजी घ्या! दिल्लीच्या कोरोना रुग्णालयात लहान मुलांची संख्या वाढली

आज तकच्या रिपोर्टनुसार, अहमदाबादमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. चेतन त्रिवेदी यांनी सांगितलं, याआधी आम्ही प्रौढ व्यक्तींमध्ये म्युकोरमायकोसिस पाहिलं. पण लहान मुलांमध्ये हे इन्फेक्शन असण्याचं हे पहिलंच प्रकरण असावं. त्यामुळे आता या आजाराला अधिक गांभीर्याने घ्यायला हवं.

म्युकोरमायकोसिसची लक्षणं

तीव्र डोकेदुखी

अंगात सतत सौम्य ताप असणं

गालावर सूज किंवा बधिरपणा येणं

नाक गळणं

जबड्यातील हिरड्यांवर पू  असलेल्या पुळ्या येणं

वरच्या जबड्यातील दातांचं हलणं

जबड्याची टाळू आणि नाकातील त्वचा यांचा रंग काळसर होणं.

वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणं.

First published:

Tags: Coronavirus, Parents and child