मराठी बातम्या /बातम्या /देश /

काळजी घ्या! दिल्लीच्या कोरोना रुग्णालयात लहान मुलांची संख्या वाढली; सतर्कतेसाठी तज्ज्ञांची समिती

काळजी घ्या! दिल्लीच्या कोरोना रुग्णालयात लहान मुलांची संख्या वाढली; सतर्कतेसाठी तज्ज्ञांची समिती

चिमुरड्यांना कोरोनापासून वाचवा

चिमुरड्यांना कोरोनापासून वाचवा

देशाची राजधानी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात लहान मुलांच्या कोरोना (Children Corona) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लहान मुलांमधील कोरोनाचे प्रमाण वाढल्याचं दिसत आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 21 मे : देशाची राजधानी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात लहान मुलांच्या कोरोना (Children Corona) रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण चार टक्क्यांनी जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून या रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) झाल्यानं एकूण 29 मुलांना दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तीन मुलांना ऑक्सिजन प्रणालीवर ठेवण्याची वेळ आली होती. मात्र, गेल्या वर्षी या दरम्यानच फक्त सात ते आठ मुलांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या कोरोना विषाणूच्या लाटेमध्ये जास्त रुग्ण सापडल्यामुळं मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे की, हा येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा परिणाम आहे, यावर सध्या विचार विनिमय सुरू आहे. मात्र, यापैकी सध्या कुठल्याच कारणाविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मुलांमध्ये कोविडच्या लक्षणांमध्ये अतिसार, ताप, विषाणूजन्य न्यूमोनिया आणि चिडचिडेपणाचा समावेश आहे. काहींना ऑक्सिजनमध्ये घट देखील जाणवते. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी लहान मुलांमध्ये कोरोना होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, यावर्षी अधिकाधिक मुलांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात येत आहे. यामध्ये पॉझिटिव्ह मुलंही सापडत आहेत. मुलांच्या कुटुंबातील कोणाला कोरोना झाला असेल तर त्या कुटुंबातील आता लहान मुलांचीही चाचणी करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करत असलो तरी सर्वांनी शंका असल्यास लहान मुलांचीही चाचणी करून घ्यावी.

हे वाचा - रमेश वांजळेंच्या 2 सख्ख्या मेव्हुण्यांचा कोरोनानं घेतला घास; अवघ्या 12 तासात कुटुंब झालं पोरकं

लहान मुलांमध्येही कोरोना होण्याची संख्या वाढू शकते, असं गृहीत धरून रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार ठेवला आहे. गेल्या वर्षी सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची कोरोना चाचणीच करण्यात येत नव्हती. या वयोगटातील मुलांमध्ये विशेष कोणतीच लक्षणे दिसून येत नव्हती.

हे वाचा - जन्मदात्री गेली! चार मुलींनी दिला खांदा तर एकीने दिला मुखाग्नी, गावकऱ्यांचेही डोळे पाणावले

एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये 15 बालरोग तज्ज्ञांची टीम बनवली असून मुलांमध्ये होणाऱ्या कोरोना परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे 29 मुलांपैकी एकाही मुलावर विशेष कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही आणि यापैकी २२ मुलांना यशस्वीरित्या उपचारानंतर डिस्जार्ज देण्यात आला आहे. परंतु, एकूण बाधित मुलांची संख्या ही गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. आम्ही या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, गरज पडल्यास मुलांवर कसे उपचार करायचे याचे नियोजन आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी सांगितले.

First published:

Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus