मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabities रुग्णांसाठी कारलं आहे खूपच गुणकारी, 'असा' होतो फायदा

Diabities रुग्णांसाठी कारलं आहे खूपच गुणकारी, 'असा' होतो फायदा

कारल्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. कारलं हे शरिरासाठी (Health) अत्यंत गुणकारी असतं.

कारल्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. कारलं हे शरिरासाठी (Health) अत्यंत गुणकारी असतं.

कारल्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. कारलं हे शरिरासाठी (Health) अत्यंत गुणकारी असतं.

नवी दिल्ली, 17 जून : अनेकांना कारलं कडू (Bitter gourd)असल्यामुळे आवडत नाही. मात्र या कडवड कारल्यामध्ये निरोगी आरोग्यासाठी खूप फायदे लपलेले आहेत. कारलं हे शरिरासाठी (Health) अत्यंत गुणकारी असतं. अनेक आजारांवर कारलं हा रामबाण उपाय आहे.  कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असूनही, अनेक लोक कडू चवीमुळे त्याला आपल्या आहाराचा भाग बनवण्यास टाळाटाळ करतात. तुम्हीही असं करत असाल तर आत्ताच थांबवा आणि आहाराच कारल्याचा समावेश करा.

कारल्यामध्ये व्हिटॅमिन (Vitamin) ए, व्हिटॅमिन सी, झिंक, फायबर आणि लोह असे अनेक पोषक घटक असतात. आपल्या आहारात कारल्याचा समावेश केल्यास माणूस अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. ज्यांना मधुमेहाचा आजार आहे त्यांच्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. कारले डायबिटीजच्‍या रुग्णांसाठी गुणकारी आहे. कारल्याच्या बियादेखील तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. बहुतेक लोक कारल्याचा वापर करतात पण त्याच्या बिया काढून फेकून देतात. मात्र ज्याप्रमाणे कारले फायदेशीर असतं, त्याचप्रमाणे याच्या बिया देखील आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मधुमेहाच्या (Diabities)म्हणजेच डायबिटिजच्या रुग्णांसाठी कारल्याच्या बिया खूपच गुणकारी असतात.

हे ही वाचा -  Diabetes Risk: मधुमेह ठरू शकतो मृत्यूचं कारण; 'हे' 5 पदार्थ खाऊन करा नियंत्रित

रुग्णामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याने रोगांचा धोका वाढतो. अशा स्थितीत कारल्याचे सेवन बियांसोबत केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. कारल्याच्या बिया सुकवून पावडर बनवा आणि रोज गरम पाण्यासोबत सेवन करा, पोट साफ राहते.

तुमची पचनक्रिया बरोबर नसेल तर कारल्यानं तुमची रोगप्रतिकारशक्तिदेखील वाढण्यास मदत होते. कारल्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे.  जेव्हा तुम्ही कारल्याच्या दाण्यांसोबत खातात, तेव्हा ते शरीरात एक प्रकारचा रुफ्यासारखे काम करते. यामुळे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया योग्य राहते.

First published:

Tags: Health, Health Tips