पाटणा, 16 ऑक्टोबर : 'हाथी मेरे साथी' फिल्म आजही आपल्या प्रत्येकाच्या लक्षात आहे. असाच हाथीचा खरा साथी आहे तो बिहारच्या पाटण्यात (patna). ज्याने आधी आपली 5 कोटी संपत्ती हत्तींच्या (elephants) नावावर केली आणि आता त्यांच्यासाठी गाव वसवणार आहे. पाटण्यातील अख्तर इमाम (akhtar imam) आता JUMBO VILLAGE वसवणार आहेत.
जानीपूरमधील अख्तर इमाम हत्तींसाठी असलेल्या इरावत संस्थेचे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्यांचे दोन हत्तीही आहेत. एकाचे नाव मोती तर दुसर्याचे नाव राणी. मुख्य म्हणजे इमाम यांचे दोन्ही हत्तींवर जीवापाड प्रेम आहे. त्यांच्यासाठी हत्ती हेच कुटुंब किंवा समाज आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य फक्त हत्तींसाठीच वाहिलेलं आहे.
इमाम यांनी याआधी जानीपूर येखील आपली वडिलोपार्जित संपत्ती दोन्ही हत्तींच्या नावावर केली. त्यांनी आपल्या मुलाला एकही पैसा दिला नाही आणि आता ते नैनितालच्या रामनगरमध्ये हत्तींसाठी गाव वसवणार आहेत. असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
हे वाचा - VIDEO : गायीची शिकार करीत होता वाघ; अवघ्या 100 मीटरवरुन लोक घेत होते सेल्फी
इमाम यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मुलगा वाईट मार्गानं गेला होता. त्यांच्या मुलानं संपत्ती मिळवण्यासाठी वडिलांवर बलात्काराचे खोटे आरोप लगावले होते. तपासणी दरम्यान हे आरोप खोटे असल्याचे समोर आले. अख्तरचा आरोप आहे की माझा मुलगा मेराजनेही पशू तस्करांना हत्ती विकण्याचा प्रयत्न केला होता पण तो पकडला गेला. म्हणून त्याला संपत्तीचा हिस्सा न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं इमाम यांनी आपली अर्धी संपत्ती पत्नी आणि बाकी हत्तींच्या नावावर केली. इमाम यांनी रजिस्ट्री कार्यालयात जाऊन दोन्ही हत्तींच्या नावावर तयार केलेली कागदपत्रंही मिळाली आहेत.
हे वाचा - गवत खाण्यासाठी जिराफाचा जुगाड, 90 लाखांहून जास्त वेळा पाहिला गेला VIDEO
अख्तर इमाम यांनी सांगितले की, मला काही झालं तर सर्व मालमत्ता इरावत नावाच्या संस्थेच्या नावे होईल. जेणेकरुन या हत्तींचं रक्षण होईल आणि त्यांना तस्करांपासून वाचवता येईल.