जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / डोकं दुखतंय? मग विड्याचं पान खा, अजूनही आहेत भरपूर फायदे

डोकं दुखतंय? मग विड्याचं पान खा, अजूनही आहेत भरपूर फायदे

डोकं दुखतंय? मग विड्याचं पान खा, अजूनही आहेत भरपूर फायदे

विड्याचं पान आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घेऊ त्याचे फायदे -

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 28 मे : धार्मिक कार्यात विड्याच्या पानाला महत्त्व आहे. ते शुभ मानलं जातं. पण हेच पान आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जाणून घेऊ त्याचे फायदे - डोकेदुखी दूर करण्यासाठी हे पान खूप प्रभावी आहे. तुमचं डोकं दुखत असेल तर पानांचा लेप कपाळावर लावा. 30 मिनिटं ठेवा. त्यानंतर पाण्यानं धुऊन टाका. एकदम डोकेदुखी थांबेल. थंड वाटायला लागेल. HSC RESULT LIVE : बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर, एका क्लिकवर जाणून घ्या 2012मध्ये पानांच्या फायद्यांवर संशोधन करण्यात आलं. पानात अशी तत्त्व असतात जी क्रॉनिक माइलॉइड ल्यूकेमिया (CML)सोबत लढायला उपयोगी ठरतात. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ केमिकल बायोलाॅजीनंही यावर संशोधन केलंय.त्यातल्या गुणधर्मांमुळे बोन मॅरो कॅन्सर बरा व्हायला मदत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचंय? मग ही सुंदर ठिकाणं चुकवू नका विड्याचं पानं पाचकासारखं काम करतं. ते तुमच्या शरीराचा मेटाबाॅलिझम रेट वाढवतो. शरीर मिनरल्स आणि पोषक द्रव्य घेऊ शकेल अशी मदत विड्याचं पान करतं. सोबत तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर विड्याचं पान खा. तुम्हाला खोकला येत असेल तर विड्याच्या पानात हळद टाकून ते चावून खा. त्यानं खोकला थांबतो. उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्यानं होतील ‘हे’ 5 फायदे सूज आलेल्या ठिकाणी पान गरम करून बांधलं तर सूज उतरते. पान खाल्ल्यानं पोटात जंत झाले असतील तर ते त्यापासून आराम मिळतो. पानानं तोंडाची दुर्गंधी जाते. आंघोळीच्या पाण्यात ही पानं टाकून आंघोळ केलीत तर शरीराला येणारी खाज जाते. शरीर निर्जंतुक होतं. फक्त पानात कधीही तंबाखू घालून खाऊ नका. तंबाखू आरोग्यास अपायकारक आहे. VIDEO: पाणवठ्यावर एकाच वेळी 5 वाघांचं दर्शन

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात