मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Best Pizza in Bandra: वीकएण्डला मुंबईत फिरायला जाणार असाल तर इथे मिळेल बेस्ट पिझ्झा; 5 बेस्ट पिझ्झा रेस्टॉरंट्स

Best Pizza in Bandra: वीकएण्डला मुंबईत फिरायला जाणार असाल तर इथे मिळेल बेस्ट पिझ्झा; 5 बेस्ट पिझ्झा रेस्टॉरंट्स

Best Pizza Restaurant in Bandra: वांद्रे येथील ‘या’ 5 रेस्टॉरंटमधील पिझ्झानं लोकांना लावलंय वेड, एकदा नक्की भेट द्या

Best Pizza Restaurant in Bandra: वांद्रे येथील ‘या’ 5 रेस्टॉरंटमधील पिझ्झानं लोकांना लावलंय वेड, एकदा नक्की भेट द्या

मुंबईत काही कामानिमित्त किंवा सहज फिरायला म्हणून गेलात तर बांद्रासारख्या एव्हरग्रीन उपनगरात नक्की जाणं होतं. आता बांद्र्यात गेलात तर बेस्ट पिझ्झा खायला कुठे जाल? पाहा..

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 27 जुलै: अलीकडच्या काळात लोकांना चमचमीत खायची जणू चटकच लागली आहे. खासकरून तरूणाईला बाहेर जाऊन चटकदार, चविष्ट खाण्याची मोठी आवड असते. त्यातही पिझ्झा (Pizza) म्हणजे तरूणाईच्या आवडीची गोष्ट. 'पिझ्झा' हे नाव जरी ऐकलं तरी तरूणांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण पिझ्झा फक्त तरुणांनाच आवडतो असं नाही, तर तो सर्वच वयोगटातील लोक आवडीनं खातात. शनिवार आणि रविवार आला, की अनेक जण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा मग कुटूंबासोबत एखाद्या मस्त हॉटेलमध्ये जाऊन पदार्थांचा आस्वाद घेण्याचा विचार करत असतात. जर तुम्ही सुद्धा पिझ्झा खाण्यासाठी झक्कास रेस्टॉरंटच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध अशा पाच पिझ्झा रेस्टॉरंटबद्दल (Best Pizza Restaurants in Bandra, Mumbai)  माहिती देणार आहोत, जिथं जाऊन तुम्ही तुमची पिझ्झा खाण्याची हौस पूर्ण करू शकता.

1. टॉसिन पिझ्झा (Tossin Pizza )-

टॉसिन पिझ्झा वांद्यातील सर्वोत्तम पिझ्झापैकी एक आहे. येथे तुम्ही उत्कृष्ट पिझ्झाचा आनंद घेऊ शकता.

पत्ता- शॉप नंबर 9, तळमजला, रिझवी हाउस, ए विंग, 34, हिल आरडी, वांद्रे पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400050

फोन: 089762 65051

2. रे कॅफे आणि पिझ्झेरिया (Ray's Cafe & Pizzeria)-

अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं इटालियन रेस्टॉरंट असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही आपल्या कुटूंबासोबत पिझ्झा खायचा आनंद लुटू शकता.

पत्ता: 133, गझेबो हाऊस, हिल आरडी, वांद्रे वेस्ट, मुंबई , महाराष्ट्र 400050

फोन- 022 2645 1616

हेही वाचा: 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू, 5G नेटवर्क आल्यानंतर आपल्या जीवनात काय बदल होतील?

3. स्मोकिन जोस पिझ्झा, वांद्रे पश्चिम (Smokin' Joes Pizza, Bandra west)-

वांद्रे पश्चिममधील स्मोकिन जोस पिझ्झामध्ये जाऊन पिझ्झा खाण्याचा आनंद घ्यायलाच हवा.

पत्ता: शॉप नं 8, तळमजला, रिझावी महल, वॉटरफील्ड रोड, बीएचए बीएचए हॉस्पिटल जवळ, वांद्रे वेस्ट, मुंबई, महाराष्ट्र 400050

फोन:  098925 00957

4. डोमिनोज पिझ्झा (Domino's Pizza)-

पिझ्झाचा विषय चाललाय आणि त्यात डॉमिनोज पिझ्झाचं नाव नाही, असं कसं होईल. तुम्ही या जगप्रसिद्ध ब्रँडच्या पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता.

पत्ता: शॉप नं.1, ग्राउंड फ्लोर, भल्ल विला, रिंकल सीएचएस लिमिटेड, सेंट जॉन बॅप्टिस्ट आरडी, माउंट मेरी, बांद्रा वेस्ट , मुंबई , महाराष्ट्र 400050

फोन: 1800 208 1234

5. जोज पिझ्झेरिया (Joe’s Pizzeria)-

जोज पिझ्झेरिया हे पिझ्झाप्रेमींचं आवडतं रेस्टॉरंट आहे. तुम्हीही तेथे जाऊन पिझ्झाचा आस्वाद घेऊ शकता.

पत्ता: रिझवी महल, शॉप नं 2 जोस पिझ्झेरिया, 106, वॉटरफील्ड रोड, भाभा हॉस्पिटल जवळ, बांद्रा वेस्ट , मुंबई , महाराष्ट्र  400050

फोन: 088878 95491

First published:
top videos

    Tags: Pizza, Restaurant