मुंबई, 27 मार्च : आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्चमधल्या पहिल्या आठवड्यातच तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश भागातले नागरिक वाढता उष्मा आणि घामाच्या धारांमुळे त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पंखा, एसी, कूलर खरेदीला प्राधान्य दिलं जात आहे. तुम्हीदेखील एसी, कूलर खरेदीचं प्लॅनिंग करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास पर्यायाविषयी माहिती देणार आहोत. उन्हाळ्यात आल्हाददायी गारवा देणारी एक मॅट्रेस सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही मॅट्रेस अत्यंत खास आहे. उन्हाळ्यात या मॅट्रेसला मागणी जास्त असल्याने बऱ्याचदा स्टॉक शिल्लक राहत नाही. ही मॅट्रेस ई-कॉमर्स वेबसाइटवर अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. अशा या खास मॅट्रेसची फीचर्स जाणून घेऊ या.
आता ऊन चांगलं तापू लागलं आहे. वाढत्या उष्म्यामुळे अनेक जण बेजार होत आहेत. उन्हाळ्यात गारवा मिळवण्यासाठी एका खास मॅट्रेसचा विचार करू शकता. अॅमेझॉनवर कुलिंग जेल मॅट्रेस विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मॅट्रेसची किंमत अगदीच कमी आहे. सरासरी किमतीचा विचार करायचा झाला तर ती 700 ते 900 रुपयांदरम्यान मिळू शकते. या मॅट्रेसमध्ये एक खास प्रकारचं जेल असतं. या जेलमुळे ही मॅट्रेस थंड राहते. या मॅट्रेसवर झोपल्याने साहजिकच थंडावा अनुभवता येतो. यामुळे शरीराला आरामसुद्धा मिळतो. या मॅट्रेसला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. बऱ्याचदा ही मॅट्रेस अल्पावधीतच आउट ऑफ स्टॉक होते.
हेही वाचा - ‘ग्रीन टी’मुळे वेटलॉस होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
विशेष म्हणजे या मॅट्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा पंखा नसतो. त्यामुळे त्यातून कोणताही आवाज किंवा व्हायब्रेशन जाणवत नाहीत. जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात एखाद्या बेडशीटवर किंवा गादीवर झोपता तेव्हा तुम्हाला गरमी जाणवते; पण ही मॅट्रेस काहीशी वेगळी आहे. ही मॅट्रेस थंड होऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात या मॅट्रेसवर झोपल्यास पूर्ण शरीराला गारवा जाणवतो.
ही मॅट्रेस तयार करणाऱ्या कंपनीने सांगितलं, की मॅट्रेस थंड होण्यासाठी फॅन किंवा कूलरची गरज नाही. तुम्हाला ती केवळ अंथरावी लागते; पण ही मॅट्रेस जमिनीवर कदापि अंथरू नये. एखाद्या बेडवर किंवा चादर किंवा गादीवर ती अंथरावी. तेव्हाच मॅट्रेसचा परिणाम जाणवू शकतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि आरामदायी वाटतं. कुलिंग जेल मॅट्रेस खरेदी करायची असेल तर तातडीने त्याबाबत निर्णय घ्या. कारण या दिवसांत या मॅट्रेसला खूप मागणी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.