योनीमध्ये जास्त मॉईश्चर म्हणजे बॅक्टेरियांची वाढ, ज्यामुळे व्हजायनामधून जास्त डिस्चार्ज होतो आणि त्यातून दुर्गंधी येऊ शकते.
व्हजायना स्वच्छ करताना लुफाऐवजी सॉफ्ट स्पंजचा वापर करा. तसंच त्यामुळे शक्यतो सौम्य, कमी केमिकल असलेलं आणि सुगंध नसलेला साबण वापरा. साबणामुळे व्हजायनातील चांगल्या बॅक्टेरियांवर परिणाम होतो.
व्हजायनाच्या आतील भाग आपोआप स्वच्छ होत असतो, त्यामुळे व्हजायनाच्या आतील भाग साबणाने स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नका, मात्र योनीच्या समोरील भाग नीट स्वच्छ करा.
प्रायव्हेट पार्टवरील केस काढून टाका. कारण केसांमध्ये जास्त घाम येतो आणि त्या भागात ओलाव राहतो. केस काढल्याने तो भाग स्वच्छ राहण्यास मदत होईल.
गुदद्वार यांच्यामधील भागही नीट स्वच्छ करा. कारण या भागात मॉईश्चर जास्त असतं आणि त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. हा भाग स्वच्छ करताना पुढून मागच्या दिशेनं स्वच्छ करा. कारण गुदद्वाराजवळ बॅक्टेरिया असू शकतात आणि मागून पुढच्या दिशेने हा भाग स्वच्छ केल्याने हे बॅक्टेरिया योनीमार्गात जाण्याची शक्यता आहे. योनीमार्ग स्वच्छ केल्यानंतर तो स्वच्छ टॉवेलने नीट कोरडा करा.