जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Monkey Jack : आकारावर जाऊ नका, आरोग्यासाठी चमत्कारिक आहे हे फळ! फायदे वाचून व्हाल आवाक्

Monkey Jack : आकारावर जाऊ नका, आरोग्यासाठी चमत्कारिक आहे हे फळ! फायदे वाचून व्हाल आवाक्

Monkey Jack : आकारावर जाऊ नका, आरोग्यासाठी चमत्कारिक आहे हे फळ! फायदे वाचून व्हाल आवाक्

Benefits of Badhal : बेढभ आकाराचं हे फळ फणसाच्या कुटुंबातलं असलं तरी त्याची चव आंबट आणि गोड असते. हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : आयुर्वेदात अशी अनेक फळे आहेत, जी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. यातील काही गोष्टी लोकांना माहिती आहेत. परंतु अनेक गोष्टी हळूहळू विस्मृतीत जात आहेत. अशाच एका चमत्कारिक फळाचं नाव आहे बडहल. त्याला बडहल हे फळ फणसाच्या जातीतील आहे. त्याला मंकी फ्रुट आणि आर्टोकार्पस लकूचा असेही म्हणतात. बेढभ आकाराचं हे फळ फणसाच्या कुटुंबातलं असलं तरी त्याची चव आंबट आणि गोड असते. हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते. जसजसे फळ पिकते तसतसा त्याचा रंग हिरव्या ते फिकट पिवळा आणि गुलाबी छटासह तपकिरी होतो. बाजारातील बडहलच्या फळाची किंमत अवघी 50 रुपये आहे. मात्र हे औषधी गुणधर्माचे भांडार मानले जाते. याच्या सेवनाने पोट साफ राहते आणि शरीरात ऊर्जा वाढते. लखनऊच्या बलरामपूर हॉस्पिटलचे आयुर्वेदाचार्य डॉ जितेंद्र शर्मा यांच्याकडून बडहल फळाचे आरोग्यसाठी होणारे फायदे जाणून घेऊया. बडहलमध्ये आहेत हे चमत्कारी गुणधर्म तज्ज्ञांच्या मते, बडहल या फळामध्ये झिंक, कॉपर, आयर्न, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, अँटी-व्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील उष्णतेपासून आराम मिळतो. यासोबतच हे यकृताला ताजेपणा देण्याचे काम करते. इतकंच नाही तर बडहल फळच नाही तर त्याच्या बियाही आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जातात. मात्र, ते जास्त प्रमाणात खाणं हानिकारक देखील ठरू शकतं. बडहल आरोग्यासाठी 7 चमत्कारी फायदे यकृत निरोगी ठेवते यकृताशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी बडहल हे सर्वात प्रभावी फळ मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, बडहलमध्ये अँटी-इम्पलेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे यकृताची चांगली काळजी घेतात. तुम्ही ते कच्चे आणि शिजवलेले दोन्ही प्रकारे खाऊ शकता. याचे नियमित सेवन केल्याने यकृताशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. त्वचा तरूण राहते तज्ज्ञांच्या मते, बडहल फळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्याचे काम करतात. त्वचेच्या जखमा, त्वचा वृद्ध होणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील हे फळ गुणकारी मानले जाते.यासाठी बडहलच्या झाडाची साल वाळवून त्याची पावडर बनवा. त्यानंतर ते लावल्याने जखम लवकर बरी होते. याच्या वापराने तुमचे वय वाढल्यानंतरही त्वचा तरूण दिसेल. पचनसंस्था सुधारते बडहल खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते. पावसाळ्यात होणाऱ्या अपचन आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. यासाठी बडहलच्या बिया सुकवल्यानंतर त्याची पावडर बनवता येते. यानंतर जर तुम्हाला अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही ही पावडर वापरू शकता. या फळामध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते थेट खाऊ शकता. तणाव दूर करते बडहल खाल्ल्याने तणाव देखील कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, बडहलमध्ये असलेले पोषक तत्व रक्ताभिसरण संतुलित करतात आणि तणावमुक्त ठेवतात. हे चमत्कारी फळ नियमितपणे खाल्ल्याने मेंदूला गारवा मिळतो. त्यामुळे तणाव आणि स्ट्रेस लेव्हल कमी होते. तुम्ही ते कच्चे किंवा शिजवलेले दोन्ही प्रकारे खाऊ शकता. रक्त पातळी सुधारते बडहलचे सेवन केल्याने रक्त पातळी सुधारते. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्यासाठी बडहलमध्ये असलेले लोह आणि इतर पोषक तत्व प्रभावी मानले जातात. तुम्ही नियमितपणे बडहल खाल्ले तर शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया हा आजारही टाळता येतो. याशिवाय या फळामध्ये असलेले पोषक तत्व रक्त शुद्ध करण्याचे काम करतात. केसांसाठी फायदेशीर बडहल हे फळ केसांसाठी खूप गुणकारी मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. ही जीवनसत्त्वे केसांसाठी टॉनिक म्हणून काम करतात. बडहलचा नियमित वापर केल्याने निस्तेज आणि रंगलेल्या केसांना जीवदान मिळते. त्यामुळे केस मजबूत आणि घट्ट होतात. दृष्टी वाढते बडहल फळाचे सेवन डोळ्यांसाठीही चमत्कारिक मानले जाते. बडहल फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. व्हिटॅमिन ए समृद्ध हे फळ रातांधळेपणासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. तुम्ही ते कोणत्याही स्वरूपात सेवन करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात