जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Tulsi Seeds Benefits : सकाळी पोट नीट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी या बिया खा, आरोग्याला होतील अनेक फायदे

Tulsi Seeds Benefits : सकाळी पोट नीट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी या बिया खा, आरोग्याला होतील अनेक फायदे

सकाळी पोट नीट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी या बिया खा, आरोग्याला होतील अनेक फायदे

सकाळी पोट नीट साफ होत नाही? रात्री झोपण्यापूर्वी या बिया खा, आरोग्याला होतील अनेक फायदे

तुळशीच्या बियांचे सेवन शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा तुमच्या शरीराला तुळशीच्या बिया खाल्ल्याने कोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊयात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीच्या पानांचे सेवन जेवढे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते तितक्याच तुळशीच्या बियांचे सेवन देखील शरीरातील विविध समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.  तुळशीच्या बियांचे खूप फायदे असून यांच्यात भरपूर प्रमाणात फायबर आढळते. याबियांचे सेवन तुम्ही रात्री झोपताना देखील करू शकता. तेव्हा आज तुमच्या शरीराला तुळशीच्या बिया खाल्ल्याने कोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेऊयात. बद्धकोष्ठतेपासून आराम :  तुळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने त्यांचे सेवन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. तुळशीच्या बिया खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. तसेच पाचनतंत्र देखील मजबूत होते. जर तुम्हाला सकाळी पोट साफ करण्यात समस्या येत असतील तर यासाठी देखील तुळशीच्या बियांचे सेवन खूप फायदेशीर ठरते. डायबिटीजवर नियंत्रण : तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो. त्यामुळे या बिया डायबिटीजच्या रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये अनेक पोषक तत्व आणि मिनरल्स असल्याने डायबिटीजचे रुग्ण देखील याचे सेवन करू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

वजन कमी होते : तुळशीच्या बिया वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या बियांचे सेवन केल्याने पोट भरल्यासारखे वाटते. या बिया पचनासाठी देखील फायदेशीर असल्याने याचे दररोज सेवन केल्याने वजन कंट्रोलमध्ये येते. सर्दी खोकल्यावर फायदेशीर : तुळशीच्या बिया रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे हवामान बदलामुळे होणारे सर्दी खोकल्यासारखे आजार बळावत नाहीत. विजेचा बल्ब साफ करताय? घ्या अशी काळजी अन्यथा लागेल करंट हृदयासाठी फायदेशीर : तुळशीच्या बिया हृदयाच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. यात असे अनेक कंपाऊंड असतात जे आरोग्य चांगले ठेवतात. दररोज तुळशीच्या बियांचे सेवन करून तुम्ही तुमचे हृदय निरोगी ठेवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात