मुंबई, 2 मार्च : लग्नानंतर स्त्रिया जेव्हा आई होण्यासाठी तयार नसतात, तेव्हा चुकून गर्भधारणा झाली तर? अशी चिंता त्यांना नेहमी सतावत असते. यासाठी बाजारात अनेक प्रकारची गर्भनिरोधक औषधे आणि उत्पादने उपलब्ध असली तरी ती थोडी महाग आणि कमी प्रभावी आहेत. myUpchar नुसार, जर महिलांना कोणत्याही प्रकारच्या औषधांच्या त्रासापासून दूर राहायचे असेल, तर कॉपर-टी (Copper-T) बसवणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. कॉपर-टी गर्भधारणेसाठी किती प्रभावी आहे ते जाणून घेऊया.
अशा प्रकारे कॉपर-टी स्थापित केली जाते
कॉपर-टीचा आकार 'टी' या इंग्रजी अक्षरासारखा आहे, ज्यामध्ये एक प्लास्टिकची रॉड असते. त्याचा काही भाग तांब्याचा असतो. वास्तविक तांबे शुक्राणूंना मारण्याचे काम करतात. आणि शुक्राणूंशिवाय गर्भधारणा अशक्य आहे. त्यामुळे कॉपर-टी 99 टक्के प्रभावी असल्याचे मानले जाते. कॉपर-टी 10 ते 12 वर्षे काम करू शकते.
कॉपर-टी लावल्यानंतर काय करावे
myUpchar नुसार, काही महिलांना मासिक पाळीनंतर कॉपर-टीची स्प्रिंग तपासायची असते. यासाठी योनीमार्गात बोट इन्सर्ट करुन गर्भाशय ग्रीवाचा अनुभव घ्या. स्प्रिंग गर्भाशयाच्या मुखाजवळ जाणवली पाहिजे. पण, ही तार ओढणार नाही याची काळजी घ्या.
गर्भनिरोधक गोळ्या आणि त्यांचे दुष्परिणाम
कॉपर-टी लावल्यानंतर सेक्स करताना गर्भनिरोधक अवलंबण्याची गरज नाही. त्यामुळे महिलांना गर्भधारणेची भीतीही नसते. ती लावल्यानंतर गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापासून सुटका होते. कॉपर-टी स्तनपानाच्या दिवसात देखील लावता येते. गर्भनिरोधकांच्या इतर पद्धतींपेक्षा कॉपर-टी रोपण करणे थोडे कमी खर्चिक आहे.
कॉपर-टी स्थापित केल्यानंतर काय होते?
कॉपर-टी लावल्यानंतर शरीरात ते जाणवत नाही. मात्र, या लावल्यानंतर काही स्त्रियांना मासिक पाळीत क्रॅम्प्स आणि जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो. अशा परिस्थितीत आयबुप्रोफेन औषध घेतल्यास आराम मिळू शकतो. ज्या महिलांना कॉपर-टी लावल्यानंतर मासिक पाळीत खूप पेटके येत असतील त्यांनी गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे.
Sex Education | सेक्सने किडनीची समस्या दूर होते, जाणून घ्या त्याचे इतर फायदे
कॉपर-टी बसवण्यातील धोके
तसे तर कॉपर-टी हे अगदी सुरक्षित आहे. मात्र, ते बसवल्यानंतर 3 आठवड्यांच्या आत ताप, थंडी, ओटीपोटात तीव्र वेदना, छातीत दुखणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये कॉपर-टी बसवल्यानंतरही स्त्री गर्भवती राहते. अनेक वेळा असे घडते की स्त्रिया आधीच गरोदर असतात, ज्याची त्यांना माहिती नसते. कॉपर-टी बसवल्यानंतर जेव्हा त्यांना कळते की त्या गर्भवती आहेत, तेव्हा त्यांना पुन्हा कॉपर-टी काढावी लागते आणि गर्भाशयाची स्वच्छता करावी लागते. म्हणून कॉपर-टी बसवण्यापूर्वी गर्भवती नाही, याची डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी.
News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्यविषयक बातम्यांचे देशातील पहिले आणि सर्वात मोठे माध्यम आहे. myUpchar मधील संशोधक आणि डॉक्टरांसह पत्रकार , तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sex education, Sexual health