मुंबई, 1 मार्च : सेक्स (Sex) ही गोष्ट संतती आणि शारीरिक सुख (Physical pleasure) मिळवण्यासाठी केली जाते, अशी लोकांची धारणा आहे. मात्र, सेक्स केल्याने चांगला व्यायाम देखील होतो, हे अजूनही अनेक लोकांना माहिती नाही. सेक्स ही एक अशी क्रिया आहे, ज्याद्वारे रोग (Diseases) देखील दूर होतात. सेक्स करताना शरीरातील रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे हृदयासह अनेक अवयवांचा चांगला व्यायाम होतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ठराविक वेळेनंतर सेक्स केल्यास किडनी स्टोनच्या समस्येवर मात करता येते. जाणून घेऊया संशोधन काय म्हणते? आणि सेक्स केल्याने काय फायदे होतात? तुर्कीमध्ये संशोधन MyUpchar शी संबंधित AIIMS च्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी सांगतात की, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी 12 टक्के लोक मूत्रमार्गाच्या संसर्गास बळी पडतात, त्यापैकी 50 टक्के रुग्णांची किडनी खराब होते. दरम्यान, तुर्कीमध्ये झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर किडनी स्टोन स्वतःच निघून जातात. आता भारतीय यूरोलॉजिस्ट डॉक्टरही या संशोधनावर पूर्णपणे सहमत आहेत. भारतीय डॉक्टरांचा असाही विश्वास आहे की लैंगिक संबंधादरम्यान सोडण्यात येणारे एक महत्त्वाचे संयुग स्टोनला बाहेर पडण्यास उपयुक्त ठरू शकते. सेक्स हार्मोन टेस्ट म्हणजे काय? कोणती लक्षणे दिसल्यास करावी चाचणी? सेक्स करताना शरीरात नायट्रस ऑक्साइड तयार होतो युरोलॉजिस्ट म्हणतात की सेक्स दरम्यान नायट्रस ऑक्साईड शरीरात उत्सर्जित होण्यास सुरुवात होते. उत्तेजित अवस्थेत ते मूत्रमार्गातून बाहेर येते. जेव्हा नायट्रस ऑक्साईड शरीरातून बाहेर पडतो तेव्हा तो क्षण सेक्स करताना खूप आनंददायी अनुभूती देतो. मात्र, याबाबत अधिक प्रयोग आणि चाचण्या करण्याची गरज असल्याचेही डॉक्टरांचे मत आहे. या संशोधनात अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे की सेक्स करताना नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित केल्यावर मूत्रमार्गाच्या स्नायूंना खूप आराम मिळतो, त्यामुळे किडनीच्या रुग्णाला बरे वाटते. Sex Education | शुक्राणूंना निरोगी ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर हे संशोधन 75 सहभागींवर करण्यात आले तुर्कीमधील अंकारा ट्रेनिंग अँड रिसर्च हॉस्पिटलच्या क्लिनिकमधील संशोधकांनी 75 सहभागींवर संशोधन केले. या सहभागींना तीन भागांमध्ये विभागून अभ्यास डेटा तयार केला. त्यानुसार 5 मिमी पेक्षा कमी आकाराचे स्टोन असलेल्या सहभागींपैकी 83 टक्के सहभागींनी, ज्यांनी संशोधनात भाग घेतला, नियमित सेक्स केल्यावर त्यांच्या मूत्रपिंडातून हे खडे निघाले होते. काळजीपूर्वक करा प्रयोग काही तज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे की, किडनी स्टोनच्या त्रासामुळे रुग्णाला सेक्स करण्याचा सल्ला देणे योग्य नाही. सेक्सने मुतखडा बरा होतो असे कोणतेही प्रामाणिक संशोधन नाही, त्यामुळे काही प्रकरणांमध्ये त्याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. किडनी स्टोन बरा करण्यासाठी सेक्स करण्याऐवजी जास्तीत जास्त पाणी प्या आणि नियमित औषधे घेत राहा, असे या डॉक्टरांचे मत आहे. myUpchar शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, स्टोनवर अनेक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आहेत, ज्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. News18 वरील आरोग्यविषयक लेख myUpchar.com द्वारे लिहिलेले आहेत. myUpchar हे आरोग्य बातम्यांचे देशातील पहिले आणि प्रमुख माध्यम आहे. myUpchar मध्ये डॉक्टरांसह संशोधक आणि पत्रकार तुमच्यासाठी आरोग्याशी संबंधित सर्व माहिती घेऊन येत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.