मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नाभीवर तेल लावणे तर फायद्याचे आहेच, पण तुम्हाला नाभीवर हिंग लावण्याचे फायदे माहितीये?

नाभीवर तेल लावणे तर फायद्याचे आहेच, पण तुम्हाला नाभीवर हिंग लावण्याचे फायदे माहितीये?

तुम्हाला माहितीये? काही लोक हिंग नाभीवरदेखील लावतात. होय, हिंग खाण्यासोबतच नाभीवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला याच्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 8 डिसेंबर : हिंग हे भारतीय मसाल्यांपैकी एक आहे आणि ते जवळजवळ सर्वच घरांमध्ये वापरले जाते. हिंजेवानाची चव वाढवण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. मात्र तुम्हाला माहितीये? काही लोक हिंग नाभीवरदेखील लावतात. होय, हिंग खाण्यासोबतच नाभीवर लावण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला याच्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.

शतकानुशतके हिंगाचा उपयोग पोटातील गॅस, पॉट फुगणे, आणि पेटके यावर उपाय म्हणून केला जातो. त्याचे कार्मिनिटिव्ह आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म जास्त अ‍ॅसिड स्रावामुळे पोट फुगणे आणि पोटदुखीपासून आराम देतात. स्वयंपाक केल्यानंतर त्याची तीव्र चव आपल्या लाळेतील स्राव वाढवून भूक उत्तेजित करते आणि पचनास मदत करते. आता आपण हिंग नाभीवर लावण्याचे फायदे बघूया.

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी करा हे 5 नैसर्गिक उपाय

नाभीवर हिंग लावण्याचे फायदे

पोटाला थंडावा देते : झी न्यूजने दिलेल्या माहितीप्रमाणे, हिंगामध्ये ऑलिव्ह ऑइल विकास करून हे पेस्ट नाभीवर लावल्यास पोटाला थंडावा मिळतो. छातीत जळजळ होत असल्यासही या उपायाने आराम मिळतो. हा उपाय तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता.

पोटदुखीच्या त्रासावर फायदेशीर : तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल तर हिंग तुम्हाला यापासून आराम मिळवून देऊ शकते. यासाठी १ चमचा मोहरीचे तेल गरम करून त्यात थोडे हिंग घाला. हे मिश्रण नाभीवर लावल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल.

Salt Issue : मिठाचं अतिसेवन आरोग्यास ठरू शकतं त्रासदायक; संशोधक म्हणतायेत...

गॅस, पचनासाठी उपयुक्त : तुम्हाला गॅसेस किंवा आंबट ढेकर येण्याचा त्रास होत असेल त्यांनी नाभीवर हिंग लावल्यास फायदा होतो. यासाठी थोड्या गरम पाण्यात हिंग टाकून चांगले मिक्स करा. नंतर कापसाचा गोळा त्यात बुडवून नाभीवर लावा. याने तुम्हाला आंबट ढेकर, अपचन आणि गॅस या समस्यांपासून सुटका मिळेल.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle