ढेकूण हा जेवढा छोटा किटक आहे जो माणसांंचं रक्त पीतो. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंगाला खाज येत असेल आणि बिछान्यावर रक्ताचे थेंब दिसले तर वेळीच सावध व्हा. तुमच्या घरात ढेकूण असू शकतात.
ढेकूण चावल्याने कोणत्याही प्रकारचा आजार किंवा इन्फेक्शन होत नाही. पण अनेकांच्या मते, ढेकूण चावल्यावर मानसिक अडचणींना सामोरं जावं लागतं. यात वाईट स्वप्न पडणं, वेडेपणा, एन्झायटी, ऑबसेसिव्ह बिहेविअर असे मानसिक त्रास होऊ शकतात.
अॅलर्जी- ढेकूण चावल्यामुळे त्वचा जळल्यासारखी वाटते आणि लाल चट्टे उठतात. तसेच काही वेळा फोडही येतात. याशिवाय कधी- कधी गंभीर अॅलर्जीही होऊ शकते.
खाज- ढेकूण चावल्यामुळे खाज येणं ही सर्वसामान्य गोष्ट आहे. जिथे ढेकूण चावतो त्या ठिकाणी असह्य खाज सुटते.
निद्रानाश- अनेकदा ढेकूण चावल्याने तुम्ही इतके हैराण होता की झोप येत नाही. याचा तुमच्या दिवसभराच्या कामावर परिणाम होतो.
पीटीएसडी- ज्यांना ढेकूण चावतात त्यांनी मेंटल डिसॉडरचा उल्लेख केला आहे. तर काहींनी पीटीएसडी अर्थात पोस्ट ट्रॉमॅटिक डिसॉडरची लक्षणंही दिसली आहेत.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.