मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करू शकता

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणारं अनोखं हीटर जॅकेट; हवं असेल तर 'येथे' खरेदी करू शकता

'हीटर वाली जैकेट'

'हीटर वाली जैकेट'

थंडीपासून बचाव व्हावा, याकरिता आता बाजारात हीटिंग जॅकेट विक्रीसाठी आलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : उन्हाळा आला, की आपण एसी, पंखे खरेदी करतो. पाऊस पडायला लागला की रेनकोट आणि छत्रीशिवाय घराबाहेर पडता येत नाही आणि हिवाळा आला की हीटरची गरज भासते. आता एक असं जॅकेट बनवण्यात आलं आहे, की जे चालता-फिरतानाही हीटरसारखी उष्णता देतं. अशा परिस्थितीत तुम्ही जॅकेट किंवा हीटर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एकाच किमतीत दोन्ही गोष्टी साध्य करू शकता.

थंडीपासून बचाव व्हावा, याकरिता आता बाजारात हीटिंग जॅकेट विक्रीसाठी आलं आहे. हे जॅकेट तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग साइटवर अगदी सहजपणे उपलब्ध होईल. हे जॅकेट परिधान केल्यानंतर तुम्ही कडाक्याच्या थंडीतही तुमची कामं करू शकाल. मार्केटमध्ये आलेल्या हीटिंग जॅकेटमध्ये हीटर बसवण्यात आला आहे.

या हीटरचं एक बटण दाबल्यानंतर कडाक्याच्या थंडीतही मे-जूनची उष्णता जाणवू शकते. हे जॅकेट साधंसुधं नाही; पण गुणवत्तेनुसार त्याची किंमतही तितकी जास्त नाही. हे बॉडी हीटिंग जॅकेट कसं काम करतं आणि ते कुठे मिळेल, याविषयी जाणून घेऊ या.

शरीराला मिळेल चांगली ऊब -

या जॅकेटमध्ये पाच वेगवेगळे हीटिंग झोन आहेत. त्यामुळे संपूर्ण शरीराला ऊब मिळते. अगदी हाडं गोठवणाऱ्या थंडीत तुम्ही जाड कपडे परिधान करण्याऐवजी केवळ हे एक जॅकेट घालून तुमचं काम करू शकता. या जॅकेटमध्ये खास मटेरियल वापरण्यात आलं आहे. त्यामुळे ते सामान्य जॅकेटपेक्षा वेगळं आहे. जॅकेटमधलं एक बटण दाबताच त्यातले हीटिंग एलिमेंट सुरू होतात. तापमान कंट्रोल करण्यासाठी यात तीन लेव्हल देण्यात आल्या असून, त्या बटणाच्या मदतीने सेट करता येतात. हे जॅकेट धुवायचं असेल, तर तत्पूर्वी त्यातली हीटिंग एलिमेंट्स काढून ठेवावी लागतात.

हेही वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; संशोधकांचा धक्कादायक खुलासा

या अनोख्या जॅकेटची किंमत किती?

हे जॅकेट ऑनलाइन सहज मिळेल. अ‍ॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर YHG Heated Vest विक्रीसाठी उपलब्ध आहे. या जॅकेटची किंमत एखाद्या स्टॅंडर्ड किंवा सामान्य जॅकेटइतकीच आहे. सुमारे नऊ हजार रुपये किमतीचे हे जॅकेट तुम्हाला डिस्काउंटवर 4316 रुपयांना खरेदी करता येईल. या जॅकेटसोबत यूएसबी हीटिंग सपोर्टदेखील मिळतो. या सपोर्टच्या मदतीने तुम्ही हे जॅकेट चार्ज करू शकता.

First published:

Tags: Lifestyle, Viral news, Winter