मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले...

आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले...

चार हातापायाच्या या बाळाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

चार हातापायाच्या या बाळाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

चार हातापायाच्या या बाळाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

सुब्रता गुहा/पाटणा, 19 जानेवारी : सामान्यपणे माणसाला दोन हात आणि दोन पाय असतात. पण नुकतंच एक असं बाळ जन्माला आलं आहे, ज्याला चक्क चार हात आणि चार पाय आहेत (Baby with four hands and four legs). चार हातपाय असलेल्या या बाळाची सर्वत्र चर्चा होते आहे (Baby born with four hands and four legs). बिहारमध्ये जन्माला आलेल्या या बाळाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली आहे.

हफलागंजमधील अनुराधा कुमारी नावाची महिला कटिहार (Katihar) सदर रुग्णलायात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिने एका विचित्र बाळाला जन्म दिला आहे. ज्याचे एक डोकं, एक धड आहे. पण त्याचे हात-पाय चारचार आहेत. लोक याला दैवी चमत्कार म्हणत आहेत, बाळाला देवाचा अवतार मानत आहेत. त्याला पाहण्यासाठी लोक रुग्णालयात येत आहेत.

हे वाचा - सामान्य म्हणून तरुणीने 3 महिने सहन केली पाठदुखी; मेडिकल रिपोर्ट पाहताच हादरली

दरम्यान बाळाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे ही, एका खसगी क्लिनिकमध्ये तीन ते चार वेळा अल्ट्रासाऊंट केलं होतं. त्याचा बाळावर परिणाम झाला असावा. बाळ स्वस्थ आणि निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होते.

हे बाळ एकदम ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सदर रुग्णालयाची डॉक्टर शशी किरण यांनी सांगितलं, हे बाळ म्हणजे अद्भुत, विचित्र किंवा कोणताही दैवी चमत्कार नाही. मेडिकल सायन्समध्ये याआधाही असं घडलं आहे.

हे वाचा - अरे देवा! आता अज्ञात आजाराचं संकट; थेट मेंदूवरच हल्ला करत स्मरणशक्ती करतोय गायब

गेल्या वर्षी बिहारच्याच गोपाळगंजमध्ये ही तीन हात-पाय असलेल्या बाळाचा जन्म झाला होता. रबीना खातून या 30 वर्षीय महिलेला प्रसूतीवेदना चालू झाल्यानंतर तिला तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं. तिथं तिनं तीन हात आणि तीन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला. या महिलेबाबत डॉक्टर आफताब आलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दोष असल्यानं अशा प्रकारच्या अनैसर्गिक बाळाचा जन्म झाला आहे. लाखामध्ये अशी एखादीच अशी घटना होत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

First published:

Tags: Bihar, Health, Lifestyle, Small baby